Vastu Tips : संध्याकाळी किती वाजता देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते? 'या' चुका करणाऱ्यांच्या घरी पाऊल पण ठेवत नाही
हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला महत्त्वाचं स्थान आहे. लक्ष्मीला धनाची देवी मानलं जातं, त्यामुळे तिची कृपा आपल्या घरावर असावी, असं प्रत्येकाला वाटतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलक्ष्मीचा घरात प्रवेश करण्याचा विशिष्ट शुभ काळ असतो. या काळात काही चुका टाळल्या पाहिजे, अन्यथा लक्ष्मी आल्या पाऊली माघारी जाते आणि घरावर आर्थिक संकट कोसळतं.
शास्त्रानुसार, देवी लक्ष्मी संध्याकाळी घरात प्रवेश करते. सायंकाळी 4 ते 7 या वेळेत प्रदोष काळ असतो. या दरम्यान शंकराचे भ्रमण सुरू असतं. यानंतर लक्ष्मी भ्रमण करते.
लक्ष्मी संध्याकाळी सात ते नऊ वाजण्याच्या दरम्यान घरी येते.
त्यामुळे संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवावा. मुख्य दरवाजा बंद असल्यास लक्ष्मी माघारी जाते.
याशिवाय संध्याकाळी 7 च्या दरम्यान घरात केर काढू नये, अन्यथा लक्ष्मी घरात पाऊल पण ठेवत नाही.
ज्यांच्या घरात लक्ष्मी प्रवेश करते, त्या घराची आर्थिक भरभराट होते आणि त्यांनी कधी पैशाची कमतरता भासत नाही.
ज्या घरात नेहमी क्लेश, वादविवाद सुरू असतात त्यांच्या घरात लक्ष्मी जात नाही.
ज्यांच्या दारात अस्वच्छता असते, अशा ठिकाणीही लक्ष्मी पाऊल ठेवत नाही.
7 ते 9 या वेळेत ज्यांच्या घरी लोक झोपलेले दिसतात अशा घरात लक्ष्मी दारातूनच माघारी फिरते. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)