Vastu Tips : आर्थिक संकट सुरुच आहेत? मग वास्तूशास्त्रानुसार 'या' 5 गोष्टी घरात ठेवा, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न
वास्तुशास्त्रात सांगितलेल्या या पाच गोष्टी घरात ठेवल्याने नकारात्मकता दूर होते आणि धनप्राप्ती होते. यामुळे तुमचं आर्थिक संकट दूर होण्यास मदत होऊ शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेकवेळा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहिल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात, ज्यामधीलच एक म्हणजे पैशाची कमतरता किंवा आर्थिक संकट आहे.
वास्तुशास्त्रात या समस्येपासून मुक्ती मिळवण्याचे उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तूमध्ये म्हणजेच तुमच्या घरात या पाच शुभ गोष्टी ठेवल्याने पैशाची चणचण दूर होऊन सुख-समृद्धी वाढेल.
एकाक्षी नारळ हा एक दुर्मिळ प्रकारचा नारळ आहे. एकाक्षी नारळ घरात ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊ आपल्यावर कृपा-आशिर्वाद कायम राहतो. त्यामुळे घरात एकाक्षी नारळ ठेवणं शुभ मानलं जातं.
एकाक्षी नारळाची ओळख अगदी सोपी आहे. सामान्यत: कोणत्याही नारळाची शेंडी काढल्यावर तेथे तीन छिद्रे दिसतात. पण एकाक्षी नारळ काहीसा वेगळा असतो. त्याला तीन ऐवजी फक्त दोन छिद्रे असतात.
पिवळी कवडी : पिवळा कवडी देवी लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं.
देवी लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी पिवळी कवडी अर्पण करावी आणि त्यानंतर ती लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यात पूजास्थानी किंवा तिरोजीमध्ये ठेवावी. यामुळे पैशाचं संकट देखील दूर होईल.
माशाची मूर्ती : मासा आरोग्य, शक्ती, संपत्ती आणि आनंदाचे प्रतीक मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार, चांदी किंवा पितळ धातूपासून बनवलेली माशाची मूर्ती घरात ठेवल्यास आर्थिक लाभ मिळतो.
तुम्ही घराच्या उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला माशाची मूर्ती ठेवू शकता. जर धातूपासून बनवलेला मासा ठेवणे शक्य नसेल, तर तुम्ही माशांच्या जोडीचे पेंटिंग देखील घरी लावू शकता.
हत्तीची मूर्ती : वास्तुशास्त्रानुसार चांदीची हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने तुम्हाला खूप फायदा होतो. हत्ती हे शक्ती, समृद्धी आणि अधिकाराचे प्रतीक मानलं गेलं आहे. यासोबतच याला विशेष धार्मिक महत्त्व आहे.
भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना हत्ती प्रिय आहे. हत्तीलाही गणेशाचं स्वरूप मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार चांदीच्या हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने राहू ग्रह शांत होतो आणि धनवृद्धी होते.
बासरी : वास्तुशास्त्रानुसार घरात बासरी ठेवल्याने धन आणि सुख यामध्ये वृद्धी होईल. बासरी घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवल्याने आर्थिक संकट दूर होईल.