Tulsi Plant : तुमच्या घराच्या अंगणातील तुळस सारखी सुकतेय? 'या' टिप्स ठरतील फायदेशीर
Tulsi Plant : घराच्या अंगणातील तुळस सुकत असेल तर पाणी घालताना विशेष लक्ष द्या. जास्त पाणी दिल्यामुळे मुळं कुजतात आणि रोप सुकायला लागतात.
Tulsi Plant
1/9
तुमच्या घराच्या अंगणातील तुळस सतत सुकत असेल तर तुम्ही काही ट्रिक्स वापरु शकता.
2/9
तुळशीच्या कुंडीतील माती भुसभुशीत हवी आणि मातीत गांडूळ खत, वाळू, असे मिश्रण एकत्र टाकू शकता.
3/9
पाणी घालताना विशेष लक्ष द्या. जास्त पाणी दिल्यामुळे मुळं कुजतात आणि रोप सुकायला लागतात.
4/9
माती कोरडी वाटेल तेव्हाच पाणी टाका. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी घातल्यास चांगलं ठरेल.
5/9
जर पांढरी बुरशी येत असेल तर थोडं कडुलिंबाचं तेल पाण्यात मिसळून रोपांवर फवारणी करा.
6/9
जेव्हा मंजिरी येतात तेव्हा त्या लगेचच काढून टाका. अन्यथा तुळशीचे रोप व्यवस्थित वाढत नाही.
7/9
शेणखत किंवा गांडूळ खत महिन्यातून एकदा टाकू शकता. फक्त जास्त रासायनिक खतं वापरु नका.
8/9
चहा करुन झाल्यानंतर उरलेली चहा पावडर, केळीचे साल या रोपात खत म्हणून टाकू शकता.
9/9
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 20 Sep 2025 01:36 PM (IST)