Pune : त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त लक्ष दिव्यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर नगरी उजळली; हजारो भाविकांनी घेतलं दर्शन, पाहा फोटो
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे त्रिपुरी पोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात स्थित आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदा त्रिपुरी पोर्णिमा 15 नोव्हेंबरला होती, या दिवशी हजारो भाविकांनी एकत्र येत दिवे पेटवून ही पौर्णिमा साजरी केली. त्रिपुरी पोर्णिमेच्या आदल्या दिवशी वैकुंठ चर्तुदशीला रात्री बारा वाजता शिवलिंगावर तुळशीची पानं वाहिली जातात. बाकी वर्षभर शिवलिंगावर तुळशीची पानं वाहिली जात नाहीत.
त्रिपुरा नामक राक्षसाच्या वधानंतर देवदेवतांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दीपोत्सव साजरा केला होता, आणि तीच परंपरा आजही पाहायला मिळत आहे. हजारो भाविकांनी भीमाशंकर येथे येऊन भिमाशंकरांचे दर्शन घेऊन त्रिपुरी पौर्णिमा साजरी केली.
काल त्रिपुरी पोर्णिमेनिमित्ताने भीमाशंकर येथील शिवलिंगाला श्रृंगार करत रांगोळीने सजवण्यात आलं, यावेळी मंदिराला विद्युत रोषणाई देखील करण्यात आली.
भगवान शंकराने या दिवशी तारकासुराच्या तिन्ही पुत्रांचा, म्हणजे त्रिपुरांचा बीमोड केला, असुर शक्तीचा नाश झाल्यामुळे देवदेवतांनी भीमाशंकरला दीपोत्सव केला होता. हीच परंपरा आजही तशीच सुरू आहे.
तारकासूरासोबत युद्ध करुन श्री महादेव हे दमून ज्या ठिकाणी बसले, तेथून त्यांच्या अंगातून घामाच्या धारा नदी रूपात वाहू लागल्या. या नदीला भीमानदी किंवा भिवरा असं नाव पडलं. ही नदी पंढरपुरला चंद्रकोरी सारखी वाहते म्हणून तिला पुढे चंद्रभागा म्हणतात.
त्रिरकासुराच्या वधाला कमलजादेवीची मदत झाली म्हणून भीमाशंकरचे शिवलींग दोन भागात विभागलेले आहे. भीमाशंकरला दर्शनासाठी येणारे शिवभक्त उजव्या बाजूला भस्म लावतात तर डाव्या बाजूला हळदकुंकू लावतात.