Solapur : सोलापुरात दिसला 'कांतारा' पॅटर्न, 'बाळबट्टल'साठी हजारो भक्तांची गर्दी, जमाव नियंत्रणासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज
सोलापुरातील वळसंग गावातील रामलिंग चौडेश्वरी यात्रेतील बाळबट्टल विधी मद्यरात्री संपन्न झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदक्षिण सोलापूर तालुक्यातील रामलिंग चौडेश्वरी यात्रेला सुरुवात झाली असून मध्यरात्री बाळबट्टलचा विधी पाहण्यासाठी हजारोंची गर्दी जमली होती.
हातात तलवार अन् चांदीची वाटी घेतलेल्या बाळबट्टलला पाहण्यासाठी या ठिकाणी हजारोंची गर्दी जमलेली असते.
यात्रेच्या तिसऱ्या दिवशी यात्रेतील मुख्य आकर्षण असलेल्या बाळबट्टलचा विधी मध्यरात्री साजरा झाला.
बाळबट्टल पाहण्यासाठी वळसंगसह आसपासच्या गावातील हजारो भाविक यात्रेत सहभागी झाले होते.
सोलापूरच्या वळसंग येथील चौंडेश्वरी देवीची यात्रा अडीचशे वर्षांपासून परंपरा आहे.बाळबट्टल हे या यात्रेचे मुख्य आकर्षण असते.
दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्यानंतर नियंत्रण मिळवताना भाविकांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज झाला आहे.
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी भाविकांवर सौम्य लाठीचार्ज केल्याची माहिती मिळतेय.