Super Moon 2025: 2025 वर्षातला शेवटचा 'सुपर मून' आज रात्री दिसणार! नेमका किती वाजता पाहता येईल? पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांची सविस्तर माहिती

Super Moon 2025: आज श्रीदत्त जयंतीच्या दिवशी, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात रात्रभर सुपरमूनचे दर्शन होणार असल्याचे पंचांगकर्ते सोमण यांनी सांगितले..

Continues below advertisement

Super Moon 2025  last supermoon of 2025 will be visible tonight What time exactly can it be seen

Continues below advertisement
1/7
आजचा दिवस अत्यंत खास आहे. आज गुरुवार, 4 डिसेंबर रोजी श्रीदत्तजयंतीच्या दिवशी, तसेच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात रात्रभर सुपरमूनचे दर्शन होणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले.
2/7
सुपरमून ही एक खगोलीय घटना आहे, जी धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया...
3/7
सुपरमून बाबत अधिक माहिती देताना श्री.दा.कृ.सोमण म्हणाले की, चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3 लक्ष 84 हजार कि.मीटर अंतरावर असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या 3 लक्ष 56 हजार 962 कि.मीटर अंतरावर येणार आहे.
4/7
त्यामुळे त्या रात्री चंद्रबिंब 14 टक्के मोठे आणि 30 टक्के जास्त तेजस्वी दिसेल. संपूर्ण भारतातून साध्या डोळ्यांनी आपणा सर्वांस सुपरमूनचे दर्शन घेता येईल.
5/7
गुरूवार 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजून 18 मिनिटांनी पूर्वेस सुपरमून उगवेल आणि रात्रभर असेल.सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी पश्चिमेस मावळेल.
Continues below advertisement
6/7
यानंतर पुन्हा सुपरमून दर्शनाचा योग पुढल्यावर्षी 24 डिसेंबर 2026 रोजी येणार असल्याचे श्री.दा.कृ.सोमण यांनी सांगितले.
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola