Sun Transit 2025: अखेर ती शुभ वेळ आलीच! सूर्याची मिथुन राशीत एंट्री,'या' 5 राशींचे 'अच्छे दिन' सुरू, श्रीमंतीचे 3 योग बनतायत..
Sun Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 15 जून रोजी पहाटे ग्रहांचा राजा सूर्याने मिथुन राशीत भ्रमण केलंय. या भ्रमणामुळे 5 राशींसाठी शुभ दिवसांची सुरुवात झाली आहे.
Sun Transit 2025 astrology marathi news Sun transit in Gemini good days begin for these 5 zodiac signs
1/10
ज्योतिषशास्त्रानुसार, 15 जून रोजी सकाळी 6:52 मिनीटांनी ग्रहांचा राजा सूर्याने मिथुन राशीत भ्रमण केले आहे. सूर्याच्या या भ्रमणाचा परिणाम सर्व १२ राशींवर होईल. त्याचबरोबर या भ्रमणामुळे 5 राशींसाठी शुभ दिवसांची सुरुवात झाली आहे. त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया?
2/10
ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा, आत्मविश्वास, सन्मान आणि नेतृत्वाचा कारक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, 15 जून 2025 रोजी सकाळी 6:52 वाजता ग्रहांचा राजा सूर्याने वृषभ राशीतून मिथुन राशीत भ्रमण केले आहे. या भ्रमणाला मिथुन संक्रांती म्हणून ओळखले जाते. सुमारे एक महिना, म्हणजे 16 जुलै 2025 पर्यंत, सूर्य मिथुन राशीत राहील. बुध आणि गुरू आधीच मिथुन राशीत उपस्थित आहेत. यामुळे त्रिग्रही योग, बुधादित्य राजयोग आणि भद्रा राजयोग असे शुभ संयोग निर्माण होत आहेत, जे अनेक राशींसाठी फायदेशीर ठरतील.
3/10
ज्योतिषशास्त्रानुसार,मिथुन राशीत सूर्याचे संक्रमण सर्व 12 राशींवर वेगवेगळे परिणाम करते. मिथुन राशी ही बुध राशी आहे, जी बुद्धिमत्ता, संवाद आणि व्यवसायाचे प्रतीक आहे. सूर्याच्या या संक्रमणादरम्यान, मिथुन राशीत बुध आणि गुरूचा संयोग त्रिग्रही योग निर्माण करत आहे, जो करिअर, संपत्ती आणि सामाजिक प्रतिष्ठेत सकारात्मक बदल आणू शकतो.
4/10
ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि सूर्याच्या संयोगाने निर्माण होणारा बुधादित्य राजयोग विशेषतः बौद्धिक आणि वाणीशी संबंधित कामांमध्ये यश मिळवून देतो. कोणत्या राशींसाठी सूर्याचे हे संक्रमण शुभ राहील आणि त्यांच्या जीवनाच्या विविध क्षेत्रांवर त्याचा काय परिणाम होईल हे जाणून घेऊया?
5/10
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी, सूर्याचे हे संक्रमण आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढवेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि तुम्ही तुमच्या नेतृत्व क्षमतेने सर्वांना प्रभावित कराल. नवीन करार किंवा भागीदारी व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरतील. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. सामाजिक आदर वाढेल आणि तुम्ही तुमचे विचार प्रभावीपणे मांडू शकाल. आरोग्य सुधारेल आणि प्रेम जीवन गोड होईल. उपाय: सूर्य देवाला जल अर्पण करा आणि गायत्री मंत्राचा जप करा.
6/10
सिंह - सुर्याच्या या संक्रमणाचा सिंह राशीच्या लोकांच्या अकराव्या भावावर परिणाम होईल. हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगतीचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा असेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि भागीदारीतून फायदा होईल. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल. आरोग्य चांगले राहील. उपाय: सूर्य देवाला जल अर्पण करा.
7/10
तूळ - सूर्याच्या या संक्रमणाचा प्रभाव तूळ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. या काळात, प्रलंबित काम पूर्ण होईल आणि तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्हाला परदेश प्रवास किंवा परदेशाशी संबंधित कामात यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायात नवीन करार फायदेशीर ठरतील. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात रस वाढेल. तुम्हाला कुटुंब आणि शिक्षकांकडून पाठिंबा मिळेल. आरोग्य चांगले राहील. उपाय: सूर्य देवाला अर्घ्य अर्पण करा आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा.
8/10
धनु - धनु राशीच्या लोकांसाठी, हे संक्रमण करिअर आणि वैवाहिक जीवनात प्रगती करण्याच्या संधी निर्माण होतील. भागीदारीत केलेल्या कामातून फायदा होईल. व्यापाऱ्यांना लांब प्रवासातून फायदा होऊ शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा येईल. तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. आरोग्य सामान्य राहील, परंतु तणाव टाळा. उपाय: सूर्य देवाची पूजा करा आणि लाल चंदनाचा तिलक लावा.
9/10
कुंभ - सूर्याचे हे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण शुभ राहील.विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळेल. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य सुधारेल. उपाय: रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि गूळ दान करा.
10/10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 15 Jun 2025 09:13 AM (IST)