Solar Eclips 2024 : 2024 ते 2026 पर्यंत केव्हा लागणार सूर्यग्रहण? अंतराळातील दृश्य कसं असेल? जाणून घ्या
अवघ्या काही दिवसांनी वर्षातलं दुसरं सूर्य ग्रहण लागणार आहे. पंचांगानुसार, यावर्षीचं सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर 2024 रोजी लागणार आहे. मात्र, 2025-26 मध्ये हे सूर्यग्रहण कधी आणि किती वेळा लागणार आहे या संदर्भात जाणून घेऊयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App29 मार्च 2025 रोजी वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण लागणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असणार आहे. युरोप, आशियातील काही भाग, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिक महासागर, अंटार्टिका महासागरात दिसणार आहे.
21 सप्टेंबर 2025 रोजी वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण लागणार आहे. हे एक आंशिक सूर्य ग्रहण असणार आहे. हे सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागरात दिसणार आहे.
17 फेब्रुवारी 2026 रोजी वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण दिसरणार आहे. हे सूर्यग्रहण वलयाकार पद्धतीचं असणार आहे. जे अंटार्क्टिका महासागरात दिसणार आहे. याशिवाय आंशिक ग्रहण अंटार्क्टिकाच्या काही भागांत आफ्रिका, दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर आणि हिंद महासागरात दिसणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी लागणारं सूर्यग्रहण एक वलयाकार सूर्यग्रहण असणार आहे. पण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.