Astro Tips : स्वप्नात साप दिसल्यास काल सर्प दोषाचा धोका, लवकर करा 'हा' उपाय
स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात एक घटना किंवा वस्तू वारंवार दिसणे, हा भविष्याचा संकेत मानला जातो. (Image Source - istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही लोकांना स्वप्नात साप दिसतो. असं अनेक वेळा घडतं. स्वप्नात साप दिसणं शुभ की अशुभ त्याचा अर्थ काय जाणून घ्या. (Image Source - istock)
सापांशी संबंधित स्वप्नांबद्दल वेगवेगळ्या समजुती आहेत. काही स्वप्ने शुभ असतात तर काही अशुभ मानली जातात. (Image Source - istock)
स्वप्नात साप पाहणे शुभ मानले जाते, पण स्वप्नात वारंवार साप दिसणे, अत्यंत अशुभ मानले जाते. मग तो साप कोणताही रंगाचा असो, वारंवार दिसल्यास अशुभ मानलं जातं. (Image Source - istock)
व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष किंवा पितृदोष असणे, यामागचं कारण असू शकतं. (Image Source - istock)
काल सर्प दोष आणि पितृदोष यांमुळे स्वप्नात पुन्हा-पुन्हा साप दिसतो. (Image Source - istock)
वारंवार अशा सापाच्या स्वप्नांमुळे व्यक्तीचे आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊन त्याला त्रासही सहन करावा लागू शकतो. (Image Source - istock)
कालसर्प दोष किंवा पितृदोषामुळे स्वप्नात पुन्हा-पुन्हा साप दिसत असतील तर ते टाळण्यासाठी शिवमंदिरात जाऊन महामृत्युंजय मंत्राचा जप करावा किंवा भटजींकडून करून घ्यावा. (Image Source - istock)
यासोबतच निर्जन शिवमंदिरात जाऊन तांब्याचा नाग बनवून अर्पण करा. हे अर्पण करताना तु्म्हाला कोणी पाहणार नाही याचं भान ठेवा. (Image Source - istock)
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. (Image Source - istock)