Shani Dev : शनीच्या साडेसातीच्या काळात शरीराच्या 'या' भागावर होतो अशुभ प्रभाव, उपाय जाणून घ्या

Shani Sade Sati : साडेसात वर्षे ज्या राशीवर साडेसाती आहे, त्या राशीचे आयुष्य संकटात राहते. शनीच्या साडेसातीमध्ये शरीराच्या कोणत्या भागावर विपरीत परिणाम होतो?

Shani Sade Sati marathi news effects on body

1/8
शनिदेवाला न्याय देवता मानले जाते, ज्योतिषशास्त्रात शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. ज्या राशीमध्ये शनि स्थित आहे. त्या राशीबरोबरच एक पुढे आणि एक मागे म्हणजे 3 राशींवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव पडतो.
2/8
शनीच्या साडेसातीचे 3 चरण आहेत, ज्यामध्ये व्यक्तीला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो.
3/8
सध्या कुंभ, मकर आणि मीन राशीत शनीची साडेसाती चालू आहे.
4/8
शास्त्रानुसार शनि सतीच्या वेळी हाडे, बेंबी, हात, चेहरा आणि डोळे प्रभावित होतात. साडेसाती सुरू होताच, त्याचा पहिला परिणाम माणसाच्या चेहऱ्यावर 100 दिवस राहतो, जो अत्यंत वेदनादायक असतो.
5/8
जेव्हा साडेसातीच्या वेळी शनिदेव एखाद्या व्यक्तीच्या डाव्या हातावर परिणाम करतात तेव्हा ते खूप वेदनादायक होते.
6/8
या काळात व्यक्तीची निर्णयक्षमता बिघडते. तो योग्य आणि चुकीचा फरक करू शकत नाही, नेहमी काळजीत राहतो.
7/8
शनीची साडेसाती अत्यंत क्लेशदायक आहे. साडेसात वर्षे ज्या राशीवर साडेसाती आहे, त्या राशीचे आयुष्य संकटात राहते
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola