Shani 2024 : दिवाळीनंतर शनीची थेट चाल; 'या' 5 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, नवीन नोकरीसह धनात होणार अपार वाढ
कर्क रास (Cancer) : कर्क राशीच्या लोकांसाठी शनीची सरळ चाल लाभाची ठरेल. तुम्ही आर्थिकदृष्ट्या़ ताकदवान बनाल. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरदार लोकांच्या कामात स्थिरता राहील, पदोन्नतीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकिरकोळ व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. कौटुंबिक जीवन सुखकर राहील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आरोग्य चांगलं राहील.
वृश्चिक रास (Scorpio) : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीची सरळ चाल अनुकूल ठरू शकते. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. या व्यतिरिक्त कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील .
या काळात नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. त्याचबरोबर व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. करिअर आणि व्यवसायात तुमच्या प्रगतीची शक्यता आहे.
तूळ रास (Libra) : तूळ राशीला दिवाळीनंतरच्या काळात शनिदेव मेहनतीचं फळ देईल. यावेळी व्यापारी नवीन व्यावसायिक सौदे करू शकतात. त्यांचा व्यवसाय वाढेल आणि नफा होईल.
नोकरीत बढतीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन डील होण्याची शक्यता आहे, जे फायद्याचं ठरेल. उद्योगांचा विस्तार होईल. नोकरीत नवीन प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील.
मकर रास (Capricorn) : शनिची प्रत्यक्ष चाल तुमच्यासाठी शुभ ठरू शकते, कारण शनिदेव तुमच्या राशीचा स्वामी आहे. तुमच्या कुंडलीतील धन घरावर शनिदेवाचं थेट आगमन होणार आहे. यावेळी सामाजिक आणि धार्मिक कार्य केल्याने समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि पैशाशी संबंधित समस्याही दूर होतील.
व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. तसेच, तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमचा संवाद सुधारेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील.
मिथुन रास (Gemini) : शनीची सरळ चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल, यासोबतच तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
तुम्ही कामासाठी किंवा व्यावसायिक कारणांसाठी बाहेर प्रवास करू शकता. यावेळी कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि वाहन आणि मालमत्ता खरेदीची शक्यता देखील निर्माण होत आहे. तसेच या काळात तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकते.