Shani Dev: 2024 पर्यंत 'या' राशींना शनि देणार त्रास; चुकूनही करू नका 'या' चुका
कर्क - वर्ष 2024 च्या शेवटपर्यंत कर्क राशीच्या लोकांवर शनीची छाया राहील, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी कोणतेही धोकादायक काम करणे टाळावे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीच्या प्रभावाचा प्रकोप वर्ष 2024 अखेरपर्यंत राहील. या काळात वाहन चालवणे टाळावे. वाहन चालवत असाल तर विशेष काळजी घ्या.
मकर- मकर राशीच्या लोकांना 2024 च्या शेवटपर्यंत शनीच्या साडेसातीच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल. या काळात कोणाचीही मदत करण्यास नकार देऊ नका. लोकांची सेवा करत राहा.
कुंभ- कुंभ राशीचे लोक देखील 2024 मध्ये शनीच्या साडेसातीखाली राहतील. या काळात शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनि स्तोत्राचे पठण अवश्य करावे, कोणाशीही भांडण किंवा वैर करू नका.
मीन- मीन राशीच्या लोकांवर सन 2024 मध्ये शनीच्या साडेसतीचा प्रभाव दिसेल, यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
शनिदेव अशा देवतांपैकी एक आहेत, ज्यांचा राग कोणावर एकदा आला की लवकर शांत होत नाही. तसेच अशा व्यक्तीला दीर्घकाळ शनीची साडेसाती आणि संकटांचा सामना करावा लागतो.
शनिदेवाला न्यायाची देवताही म्हटले जाते. असे मानले जाते की, शनिदेव कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात, मग ते वाईट असो किंवा चांगले.
शनिदेवाची उपासना केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते असे म्हणतात. आयुष्यातील दु:ख दूर होतात.
कपट, मत्सर आणि द्वेषापासून दूर राहणाऱ्या व्यक्तीवर शनिदेव कधीही अन्याय होऊ देत नाहीत. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)