Shani Dev : 'हे' 7 संकेत दर्शवतात शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत; 'या' गोष्टींकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
Shani Dev : तुमच्यावरही शनिदेवाची कृपा असेल आणि शनिदेव तुमच्यावर प्रसन्न असतील तर हे 7 संकेत जाणून घ्या.
Continues below advertisement
Shani Dev
Continues below advertisement
1/12
हिंदू धर्मात शनिदेव म्हटलं की अनेकांना असं वाटतं की साडेसाती आणि वाईट गोष्टी आयुष्यात घडतात. त्यामुळे अनेकांना शनिदेवाची प्रचंड भीती वाटते.
2/12
मात्र, जेव्हा शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात तेव्हा त्यांच्या कृपेनं आपल्या जीवनात अनेक चांगल्या गोष्टी घडतात.
3/12
जर तुमच्यावरही शनिदेवाची कृपा असेल आणि शनिदेव तुमच्यावर प्रसन्न असतील तर हे 7 संकेत जाणून घ्या.
4/12
अनेकांना आयुष्यात कोणत्याही गोष्टीत लगेच यश मिळत नाही. पण, जर तुम्हाला आयुष्यात तुमच्या कष्टाचं योग्य फळ मिळत असेल तर हे तुमच्यावर शनि देवाची कृपा असल्याचं संकेत आहे.
5/12
तसेच, जर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत शांत राहत असाल आणि योग्य नियमांचे पालन करत असाल तर हे शनिदेव तुमच्यावर प्रसन्न असल्याचे संकेत असू शकतात.
Continues below advertisement
6/12
ज्यांच्यावर शनिदेव प्रसन्न असतात त्या व्यक्ती कधीही खोटं बोलत नाहीत तसेच कोणासोबतही वाईट वागत नाहीत.
7/12
ज्या व्यक्तींवर शनिदेवाची कृपा असते त्यांना इतरांची मदत करायला आवडतं तसेच गरजूंची मदत करणं आणि सर्वांशी विनम्रपणाने वागणं हे ही शनिदेवाची कृपा असण्याचं संकेत आहे.
8/12
जर तुमच्यावर शनिदेवाची कृपा असेल तर आयुष्यात काही गोष्टी तुम्हाला मिळणार नाहीत पण तुम्हाला त्यापेक्षा काहीतरी चांगलं मिळेल.
9/12
तसेच, ज्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते ते वाईट परिस्थितीला धाडसानं सामोरं जातात.
10/12
याबरोबरच ज्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते त्यांना उशीरांन यश प्राप्ती होते. मात्र, त्यांना मिळालेलं यश हे त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.
11/12
धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला योग्य नियमांचे पालन करावे लागते. तसेच, शनिदेवाची मनोभाने पूजा-अर्चना केल्यास शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात.
12/12
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 16 Mar 2026 09:24 AM (IST)
= 12">