Shani Dev : शनीची तिसरी दृष्टी असणार सर्वात खतरनाक, 12 जुलैपर्यंत 'या' राशींना सतर्कतेचा इशारा
Shani Dev : मंगळ ग्रह सध्या मेष राशीत आहे. 12 जुलैपर्यंत तो याच राशीत विराजमान असणार आहे.
Shani Dev
1/11
मंगळ ग्रहावर शनीची तिसरी नजर कर्क राशीच्या लोकांसाठी फार नकारात्मक प्रभाव पाडणारी आहे.
2/11
या दरम्यान तुमच्या व्यवसायात तुम्हाला नुकसान होईल. तसेच, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, करिअरमध्ये चढ-उतार पाहायला मिळतील.
3/11
कन्या राशीच्या लोकांना जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. तरच तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. या दरम्यान वाणीवर नियंत्रण ठेवा.
4/11
पण, एक सकारात्मक दृष्टिकोण ठेवा. तुमचेही चांगले दिवस येतील. कामाच्या ठिकाणी वादविवादात गुंतू शकता. जितके कमी बोलाल तितके चांगले आहे.
5/11
तूळ राशीच्या लोकांना हा काळ धैर्याने आणि सामंजस्याने घालविण्याचा काळ आहे. संपत्ती संबंधित तुम्हाला अनेक समस्या येऊ शकतात.
6/11
तसेच, तुमच्या घरात तणाव वाढण्याची शक्यता आहे. जे तरूण अविवाहित आहेत त्यांना लग्नासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागेल.
7/11
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा 20 दिवसांचा कालावधी फार कठीण असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक समस्या येतील पण त्यांचा धैर्याने सामना करा.
8/11
तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला एखादी वाईट बातमी ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका.
9/11
मकर राशीच्या लोकांसाठी कामाचा ताण आणखी वाढताना दिसेल. तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
10/11
या काळात तुमच्या नात्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या पार्टनरबरोबर चांगला व्यवहार ठेवा.
11/11
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 23 Jun 2024 08:22 AM (IST)