Shani Saade Saati: शनिदेव 'या' देवांना घाबरतात; लोक साडेसाती, ढैय्यापासून वाचण्यासाठी 'याच' देवांचा धावा करतात
शनिदेवाला न्यायाधीश आणि दंडाधिकारी म्हणतात. त्यामुळे शनिदेवाचे नाव ऐकताच लोक घाबरतात. पण शास्त्रात अशा देवांचा उल्लेख आहे, ज्या देवांना स्वतः शनिदेवही घाबरतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशनिदेवाला क्रूर देवही म्हटलं जातं. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, शनीलाही काही देवांची भीती वाटते. यामुळेच साडेसाती किंवा ढैय्यासारख्या शनीच्या प्रकोपापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी लोक या देवतांची पूजा करतात.
भगवान शिव : देवांचा देव महादेव... असं म्हटलं जातं. कर्मवादी म्हणून ओळखले जाणारे शनिदेव भगवान शंकराला घाबरतात.
पौराणिक कथांनुसार, एकदा भगवान शंकरानं शनिदेवाला धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हापासून शनिदेवाला शिवाची भिती वाटते. असं मानलं जातं की, भगवान शंकराची पूजा केल्यानं शनीच्या प्रकोपापासून बचाव होतो.
हनुमान जी (Hanuman) : शनि महाराज हनुमानाला देखील घाबरतात. एकदा हनुमानजींनी शनिदेवाचं रक्षण केलं होतं. तेव्हापासून शनिदेवानं त्यांना वचन दिलं होतं की, शनिवारी हनुमानजींची पूजा करणाऱ्या कोणत्याही भक्ताला शनि कधीही इजा करणार नाही.
श्री कृष्ण: शनिदेव हे श्रीकृष्णाचे परम भक्त म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ते भगवान श्रीकृष्णाला घाबरतात. शनिदेवानं श्रीकृष्णाला वचन दिलं होतं की, जे कृष्ण भक्त चांगलं कर्म करतात, त्यांना त्यांच्या साडेसाती आणि ढैय्याचा अजिबात त्रास होणार नाही.
शनिदेव आपल्या पत्नीलाही घाबरतात. पौराणिक कथेनुसार, आपल्या पत्नीच्या शापानंतर, शनिदेवाची दृष्टी अशी झाली की, जो कोणी पाहील त्याचं नुकसान होईल.
शनिदेवाच्या प्रकोपापासून बचाव करण्यासाठी लोक पिंपळाच्या झाडाची पूजा करतात. असं म्हटलं जातं की, शनिदेवही पिंपळाच्या झाडाला घाबरतात. याचं कारण असं की, एकदा ऋषी पिपलाद पिंपळाच्या झाडाखाली तपश्चर्या करत असताना शनिदेवानं त्यांच्या पायावर हल्ला केला, त्यामुळे त्यांचा पाय मोडला.