Shani Amavasya 2025 : शनि अमावस्येला नशीब उजळणार; वाचा शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्याचे मार्ग
Shani Amavasya 2025 : 23 ऑगस्ट 2025 रोजी शनी अमावस्या येत आहे. ही श्रावणी अमावस्या असून शनिवारी आल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Shani Amavasya 2025
1/11
23 ऑगस्ट 2025 रोजी शनी अमावस्या येत आहे. ही श्रावणी अमावस्या असून शनिवारी आल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
2/11
शनी अमावस्येला सर्व संकटांपासून मुक्त होण्यासाठी त्यांच्या आई आणि गुरु म्हणजे शुक्राला प्रसन्न करणं आवश्यक आहे.
3/11
महाभारत, पुराण आणि नाडी ग्रंथांमध्ये याच वर्णन आहे की शनि यांनी शुक्राचार्यांना आपले गुरु आणि मातृतुल्य मानले आहे.
4/11
त्या काळात शुक्राचार्यांनी शनीला आश्रय आणि शिक्षण दिले. म्हणून शनि शुक्रांना केवळ गुरुच नाही तर आईसमान मान देतात.
5/11
ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि शुक्र हे सर्वात जास्त मैत्रीपूर्ण ग्रह आहेत शनि-शुक्र योग असल्यावर धन, ऐश्वर्य, राजसत्ता आणि कलात्मक यश मिळते.
6/11
शनि अमावस्या हा दिवस शनीच्या उपासनेसाठी अत्यंत प्रभावी आहे या दिवशी शुक्राच्या काही विशेष उपाय केल्याने दोन्ही ग्रहांची एकत्र कृपा मिळते.
7/11
विशेष वस्तू दान करावे: पांढरे कपडे, पांढरे फुल, दही, तूप, साखर, तांदूळ हे वस्तू गरीब स्त्रिया, कन्या, ब्राह्मण किंवा मंदिरात दान करावे.
8/11
शुक्राचा बीज मंत्र : “ॐ द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः” या मंत्राचा शनि अमावस्येला किमान 16 माळा जप करावा संध्याकाळी या मंत्राचा जाप करावा आणि गुलाब किंवा चमेलीच्या अगरबत्त्या लावून शुक्राला प्रसन्न करावे.
9/11
शनि-शुक्र संतुलनासाठी: शनिदेवाला काळ्या तीळ-तेलाचा दीप लावावा आणि शुक्राला दुध, साखर आणि तुपाचा दीप लावा या उपायाने शनि-शुक्र दोन्ही ग्रह एकत्र प्रसन्न होतात.
10/11
आर्थिक अडथळे दूर होतात, वैवाहिक जीवनात मधुरता येते, आलिशान सुख, गाडी, घर, ऐशोआराम आणि कला-प्रतिभेत यश मिळते.
11/11
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 23 Aug 2025 09:46 AM (IST)