Shani Amavasya 2025 : शनि अमावस्येनिमित्त शनि शिंगणापूर परिसर दुमदुमला; दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदियाळी, पाहा PHOTOS
Shani Amavasya 2025 : आज श्रावण महिन्यातील अमावस्या असून ही अमावस्या शनिवारी आल्याने भाविकांनी शनि दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
Continues below advertisement
Shani Amavasya 2025
Continues below advertisement
1/9
श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि शनी अमावस्या या दुर्मिळ योगामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथे शनिदर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी झाली आहे.
2/9
शनि शिंगणापूर येथील शनि देवस्थान जागृत देवस्थान आहे. त्यामुळे सबंध देशातीलच नाही तर विदेशातूनही भाविक शनि दर्शनासाठी शिंगणापूर येथे येतात.
3/9
विशेष म्हणजे शनिवार, अमावस्या आणि श्रावण महिन्यात शनी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.
4/9
अशातच आज श्रावण महिन्यातील अमावस्या असून ही अमावस्या शनिवारी आल्याने भाविकांनी शनि दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
5/9
शनी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला असून शिंगणापूर गावातही शनी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय.
Continues below advertisement
6/9
शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी भाविक तैलाभिषेक करतात. मात्र भाविकांची गर्दी पाहता शनि देवस्थानाने चौथर्यावर जाऊन शनीला तैलाभिषेक बंद केला असून भाविकांसाठी शनिचा तैलाभिषेक चौथऱ्या खालूनच करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
7/9
या ठिकाणी लाखो भाविक शनि देवाची पूजा करताना दिसतायत. शनि देवाचा फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद करुन देखील काही भक्त नमन करताना दिसतायत.
8/9
शनि अमावस्येनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन शनैश्वर देवस्थान ट्रस्टकडून शनि भक्तांसाठी पार्किंग,दर्शन रांग आणि आपत्कालीन आरोग्य सुविधा अशा सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
9/9
दरम्यान, आजची शनि अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या असल्या कारणाने आजच्या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे.
Published at : 23 Aug 2025 09:18 AM (IST)