Rahu Transit 2025: ज्याच्यात राजाचा रंक करण्याची ताकद! '18 मे' ला राहूचे भ्रमण, 'या' राशींना होणार बंपर लाभ, तर 'या' राशींना सावधानतेचा इशारा
Rahu Transit 2025: ज्योतिषशास्त्रात राहूचे भ्रमण महत्त्वाचे मानले जाते, कारण राहूचे परिवर्तन जवळजवळ 18 महिन्यांपर्यंत प्रभावी राहते. यामुळे काही राशींना फायदे तर काहींना अडचणींचा सामना करावा लागतो.
Rahu Transit 2025 astrology marathi news Rahu transit in Aquarius on May 18 these zodiac signs will get bumper benefits while some zodiac signs are warned
1/9
वैदिक ज्योतिषशास्त्रात, राहू आणि केतू हे छाया ग्रह मानले जातात, परंतु खगोलशास्त्रात त्यांना ग्रहांऐवजी सूर्य आणि चंद्राच्या दक्षिण आणि उत्तर नोड्स म्हणून पाहिले जाते. त्यामुळे राहू ला खूप महत्त्व आहे. कुंडलीतील राहूची स्थिती नेहमीच पहिली जाते. कारण त्यामुळे दोष निर्माण होत असतात.
2/9
गुरुच्या मीन राशीत दीड वर्ष घालवल्यानंतर, राहू आता 18 मे 2025 रोजी संध्याकाळी 05:08 वाजता शनीच्या कुंभ राशीत भ्रमण करणार आहे, राहू सुमारे 18 महिने एका राशीत भ्रमण करतो. राहूच्या संक्रमणाचा परिणाम लगेच दिसून येतो.
3/9
राहूचे कुंभ राशीत भ्रमण: या राशींना फायदा होणार- मिथुन (Gemini)- नवे करार, वैदेशिक संधी, करिअरमध्ये प्रगती, मानसिक ऊर्जा वाढेल, आत्मविश्वास वाढेल. तूळ (Libra)- कलात्मक किंवा सर्जनशील क्षेत्रात यश, प्रेमसंबंध सुधारतील, नवा जोडीदार मिळू शकतो, आर्थिक लाभाचे योग. धनु (Sagittarius)- प्रवास व शिक्षणासाठी उत्तम वेळ, बौद्धिक क्षमता वाढेल, बंधु-भगिनींबरोबर संबंध सुधारतील
4/9
राहूचे कुंभ राशीत भ्रमण: या राशींनी सावधानता बाळगावी- कर्क (Cancer)-अचानक खर्च, मानसिक तणाव, अनावश्यक कर्ज घेण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या. सिंह (Leo)-वैवाहिक व व्यावसायिक भागीदारीत तणाव, गैरसमज वाढू शकतात, न्यायालयीन प्रकरणे उद्भवू शकतात. मकर (Capricorn)-आर्थिक क्षेत्रात चढउतार, आत्मविश्वास डळमळीत, चुकीचे निर्णय होण्याची शक्यता
5/9
राहूचे दोष टाळण्यासाठी उपाय: राहू बीज मंत्र जप: “ॐ भ्रां भ्रीं भ्रौं सः राहवे नमः” – दररोज 108 वेळा जप करा नारळ, निळे कपडे, काळे तीळ दान – शनिवारच्या दिवशी
6/9
कालसर्प दोष निवारण पूजा (जर कुंडलीत राहू-केतू विशेष अशुभ स्थितीत असतील) शनि मंदिरात तेल अर्पण – राहूवर शनीचा प्रभाव असतो, गोमूत्र मिश्रित पाणीने घर पुसणे – राहूच्या नकारात्मक उर्जेपासून संरक्षण, चांदीची अंगठी डाव्या हातात घालावी (विशेषतः महिलांसाठी), पुरुषानी गोमेद व निलम किवा पन्ना घालावा,
7/9
काही आचार्य वृश्चिक आणि धनु राशीला राहूची नीच राशी मानतात, तर काही वृषभ आणि मिथुन ही राहूची उच्च राशी मानतात. कधीकधी राहूमुळे ग्रहण होते, म्हणून राहूची स्थिती महत्त्वाची असते. जर राहू आणि केतू मध्य आणि त्रिकोणी घरांच्या स्वामींसोबत चांगल्या स्थितीत असतील तर ते राजयोग निर्माण करते आणि त्यांची दशा एखाद्या व्यक्तीला दरिद्रीकडून श्रीमंत बनवू शकते.
8/9
राहूला लग्नकारक असेही म्हणतात, म्हणून राहूच्या महादशा आणि अंतर्दशा दरम्यान, त्या व्यक्तीचा विवाह होण्याची शक्यता असते. जर शुभ स्थिती असेल तर राहूच्या गोचरामुळे विवाह देखील होऊ शकतो. राहूला कलियुगाचा राजा म्हणून सुद्धा संबोधले आहे, राजाचा रँक आणी रंकाचा राजा बनविण्याची ताकद त्यात आहे
9/9
वैदिक ज्योतिषशास्त्रात राहूला एक रहस्यमय ग्रह मानले जाते. हा ग्रह राजकारण आणि राजनैतिकतेशी संबंधित आहे. धार्मिक मान्यतेनुसार, जेव्हा भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले तेव्हा त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने स्वरभानू नावाच्या राक्षसाचे डोके आणि धड कापले, ज्याने त्यांना अमृत मिळविण्यासाठी फसवले होते. पण अमृत प्यायल्यानंतर राक्षस मेला नाही आणि त्याचे डोके आणि धड दोन्ही जिवंत राहिले. डोक्याचे नाव राहू आणि धडाचे नाव केतू होते.
Published at : 15 May 2025 09:47 AM (IST)