Premanand Maharaj: देव आपल्याला का दिसत नाही? देवी-देवतांना प्रत्यक्ष पाहायचंय? प्रेमानंद महाराजांनी सांगितला प्रभावी मार्ग, जाणून व्हाल थक्क...
Premanand Maharaj: वृंदावनच्या प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते आपल्याला देव का दिसत नाही? याबद्दल भक्तांना सांगत आहेत..
Premanand Maharaj hindu religion marathi news Why cant we see God Want to see the gods and goddesses
1/7
तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाची देवावर विशेष श्रद्धा असते. काही लोक देव-देवतांना त्यांच्या नावाचा जप करून प्रसन्न करतात, तर काही लोक त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण करून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाला देवाचे प्रत्यक्ष दर्शन घेणे सोपे नाही. पौराणिक कथेनुसार, फार कमी धार्मिक गुरुंना देव-देवतांचे दर्शन झाले आहे. पण सामान्य माणूस देवाला सहज पाहू शकत नाही.
2/7
कधीतरी तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल की देव का दिसत नाही? आजच्या कलियुगात डोळ्यांनी देव पाहता येतो का? वृंदावनचे प्रसिद्ध कथाकार संत प्रेमानंद महाराज यांना एका भक्ताने हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिले? जाणून घ्या..
3/7
प्रेमानंद महाराज म्हणाले, 'आपल्या हृदयातील प्रेमाचे डोळे जेव्हा उघडतात तेव्हा याच डोळ्यांमध्ये प्रकाश असतो.' जसे की, विराट रूप पाहण्यासाठी, भगवंताने अर्जुनला दिव्य दृष्टी दिली होती, ज्यामुळे तो विराट रूप पाहू शकला.
4/7
खरंतर, देव प्रत्येकाच्या हृदयात राहतो. पण जोपर्यंत आपल्या हृदयात प्रेम नसेल, तोपर्यंत आपण देवाला पाहू शकणार नाही. जर तुम्हाला देवाला पहायचे असेल तर त्यांचे नाव घ्या. जो व्यक्ती नामाचा जप करतो, त्याच्या हृदयात प्रेम राहते आणि एके दिवशी तो देवाला प्रत्यक्ष पाहू शकतो.
5/7
प्रेमानंद महाराज म्हणतात, मायेच्या तीन गुणांना सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण असे म्हणतात. हे तीन गुण विश्वाच्या निर्मिती, देखभाल आणि विनाशात गुंतलेले आहेत, जे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर देखील परिणाम करतात.
6/7
सत्वगुण हे पवित्रतेचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे व्यक्ती चांगल्या कर्मांसाठी प्रेरित होते. तर रजोगुण हे निसर्गाचे स्वरूप मानले जाते, जे व्यक्तीमध्ये उत्साहाची भावना निर्माण करते. तर तमोगुण हे अज्ञान, अंधार, आळस आणि निष्क्रियतेचे प्रतिनिधित्व करते.
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 26 May 2025 12:31 PM (IST)