Pitru Paksha 2025 : एकाच दिवशी दोन ग्रहांचं संक्रमण आणि नवमी श्राद्ध; 15 सप्टेंबरपासून 'या' राशींचं नशीब पालटणार

Pitru Paksha 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, 15 सप्टेंबरचा दिवस फार खास असणार आहे. कारण या दिवशी पितृपक्षाचं नवमी श्राद्ध आहे. त्याचबरोबर, बुध आणि शुक्रसारखे महत्त्वाचे ग्रह राशी परिवर्तन करणार आहे.

Continues below advertisement

Pitru Paksha 2025

Continues below advertisement
1/7
15 सप्टेंबर 2025 रोजी ग्रह-नक्षत्रांची दृष्टी फार महत्त्वाची असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस काही राशींसाठी फार अनुकूल ठरणार आहे. या दिवशी कोणकोणत्या ग्रहांची चाल बदलणार आहे ते जाणून घेऊयात.
2/7
शुक्र ग्रह - धन, ऐश्वर्य, प्रेमाचा कारक शुक्र ग्रह 15 सप्टेंबर रोजी कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश केला आहे. शुक्र ग्रहाचं सिंह राशीत संक्रमण सूर्य आणि केतूसह युती बनवणार आहे.
3/7
सिंह राशीत शुक्र ग्रहाचं संक्रमण मेष, तूळ आणि वृश्चिक राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे. तर काही राशींना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
4/7
बुध ग्रह - या दिवशी बुद्धी आणि वाणीचा कारक बुध ग्रह राशी बदलणार आहे. या दिवशी बुध ग्रह संक्रमण करुन कन्या राशीत असेल.
5/7
बुध ग्रहाचं हे संक्रमण धनु, मिथुन आणि कन्या राशींसाठी फार सकारात्मक ठरणार आहे. या तीन राशींचं नशिब लवकरच पालटणार आहे. तर काही राशींसाठी हे संक्रमण सामान्य ठरणार आहे.
Continues below advertisement
6/7
नवमी श्राद्ध - आज पितृपक्षाचं नवमी श्राद्ध आहे. या दिवशी मृत व्यक्तीचं श्राद्ध केलं जातं. ज्या लोकांचा मृत्यू कोणत्याही महिन्याच्या नवमी तिथीला झाला त्यांचं श्राद्ध आजच्या दिवशी घातलं जातं.
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola