Pitru Paksha 2024 : पितृपक्षात वारंवार पूर्वज स्वप्नात दिसतायत? सावध व्हा; 'या' गोष्टीचा मिळतोय संकेत
पंचांगानुसार पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सुरू होते आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येला समाप्त होतो. त्यानुसार आज तृतीया तिथी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअसं म्हणतात की पितृपक्षाच्या काळात पितृ जमिनीवर येतात आणि जेव्हा आपण त्यांच्या मोक्षासाठी श्राद्ध, तर्पण किंवा दान करतो तेव्हा ते प्रसन्न होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देतात.
पितृपक्षात अनेकदा आपल्याला मृत आई-वडील किंवा कोणी पूर्वज आपल्या स्वप्नात येतात. हा एक महत्त्वाचा संकेत आहे. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, 17 सप्टेंबर रोजी पितृपक्षाची सुरुवात झाली आहे त्यानुसार 2 ऑक्टोबरपर्यंत हे श्राद्ध असणार आहे.
या दरम्यान कोणाच्या स्वप्नात मृत माता पिता किंवा पूर्वज नाराज दिसत असतील तर त्यामागे असा संकेत आहे की ते तुमच्याबरोबर नाराज आहेत.
पितृपक्षाच्या काळात पितृ धरतीवर वास करतात. आणि आपल्या स्वप्नांच्या माध्यमातून ते आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी धरतीवर येतात. जर आपले पितर उदास दिसत असतील तर हा शुभ संकेत नाही.
जर पितृपक्षाच्या दिवसांत मृत माता-पिता किंवा पूर्वज तुमच्या स्वप्नात येत असतील तर याचा अर्थ असा आहे की ते धरतीवर वास करतायत आणि त्यांचं तर्पण किंवा श्राद्ध करणं आवश्यक आहे.
तसेच, या काळात तर्पण करण्याबरोबरच पाहुण्यांचं आदरातिथ्य करणे, कावळा, गाय किंवा कुत्र्याला चपाती द्यावी. असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)