Pitru Paksha 2024: पितृ पक्षात केवळ 'या' वेळेतच श्राद्ध विधी करा; अन्यथा... पितर राहतील असंतुष्ट
पितृ पक्षात श्राद्ध केव्हा आणि कसं करावं? हे ज्योतिषांकडून जाणून घ्या...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंडित सौरभ गणेश शर्मा यांनी सांगितलं आहे की, धार्मिक शास्त्रानुसार, भाद्रपद शुक्ल पौर्णिमा ते अश्विन कृष्ण अमावस्येपर्यंत पितृ पंधरवडा असतो. यामध्ये श्राद्धाचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो.
श्राद्धाच्या 16 तिथी आहेत, व्यक्तीचा मृत्यू कोणत्याही एका तिथीला होतो, मग ती कृष्ण पक्ष असो, वा शुक्ल पक्ष.
ज्या दिवशी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, ती तिथी श्राद्धात येते, तेव्हा ज्या तिथीला व्यक्तीचा मृत्यू झाला, त्या तिथीलाच त्या व्यक्तीचं श्राद्ध करण्याची परंपरा आहे.
पौर्णिमेला मृत्यू झालेल्या व्यक्तींचं श्राद्ध सर्वपित्री आमावस्येला करतात. श्राद्ध पक्षाच्या पहिल्या दिवसाला प्रोष्ठपदी पौर्णिमा असंही म्हणतात.
ज्या तिथीला पूर्वजांचा मृत्यू झाला, त्या दिवशी वैदिक मंत्रांच्या पठणासह घरांमध्ये विशेष पूजा केली जाते. त्यानंतर नद्या, तलाव, समुद्र इत्यादी ठिकाणी वैदिक मंत्रोच्चारात तर्पण केलं जातं.
पितरांच्या शांतीसाठी पितृपक्षातील श्राद्धाच्या दिवशी गाय, काळा कुत्रा, कावळे यांच्यासाठी वेगळा नैवेद्य वाढून त्यांना खाऊ घातला जातो.
शास्त्रानुसार पितृ पक्षात सकाळी आणि संध्याकाळी देवदेवतांची पूजा केली जाते, तर दुपारची वेळ पितरांना समर्पित केली जाते. त्यामुळे पितरांचं श्राद्ध दुपारी करणं उत्तम मानलं जातं.
(टीप : वर सांगण्यात आलेल्या सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)