Pitru Paksha 2024 : पितृपक्षात पितरांना चुकूनही दाखवू नका 'या' 5 भाज्यांचा नैवेद्य; घरावर ओढावेल संकट, पितर होतील नाराज
कंदमुळं खाऊ नका : हिंदू धर्मानुसार, जमिनीखाली तयार होणार्या भाज्यांचं अर्थात कंदमुळांचं सेवन पितृपक्षात करू नये. कंदमुळांमध्ये बटाटा, मुळा, रताळी यांसारख्या भाज्यांचा समावेश होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्राद्धाच्या जेवणात देखील कंदमुळं असू नये. पितरांना देखील कंदमुळांचा नैवेद्य दाखवू नये, अन्यथा पितरांच्या रोषाला सामोरं जावं लागतं.
लसूण-कांदा खाऊ नये : शास्त्रात म्हटलं गेलंय की, प्रत्येक खाद्यपदार्थांच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावर आणि प्रकृतीवर, मानसिकतेवर परिणाम होतो. पितृपक्षात आहार आणि आचार हा सात्त्विक असावा असं शास्त्र सांगतं. जेवणात सतत लसूण-कांदा वापरल्याने स्वभावात तापटपणा, चिडचिड वाढते.
शास्त्रानुसार, धार्मिक विधीसाठी तयार होणार्या जेवणातही कांदा-लसूण यांचा वापर निषिद्ध आहे, म्हणूनच पितृपक्षात कांदा-लसूण खाणं टाळावं.
मसूर डाळ : पितृपक्षात मसूर डाळ देखील खाऊ नये किंवा मसूर डाळीचा नैवेद्य देखील पितरांना दाखवू नये.
तुम्हाला वडे वैगेरे बनवायचे असतील तर तुम्ही इतर डाळींचा वापर करू शकता, परंतु मसूर डाळीचा वापर करू नये.
चणे खाऊ नये : पितृपक्षात चणे खाणंही चुकीचं मानलं गेलं आहे. श्राद्धाच्या जेवणात चण्यांचा, चण्याच्या डाळीचा वापर करू नये.
पितृपक्षात चण्याच्या डाळीची आमटी, चण्याच्या पिठापासून बनलेली मिठाई किंवा चण्याच्या पिठापासून बनलेले पदार्थ खाणं टाळावं.
मांसाहार आणि दारूचं सेवन टाळावं : हिंदू धर्मातील प्रथेनुसार, पितृपक्षात मांसाहार किंवा अंडं खाणं पूर्णपणे वर्ज्य आहे.
दारू पिणं, विडी-सिगारेट ओढणं, तंबाखू खाणं या गोष्टीही पितृपक्षात निषिद्ध आहे. त्यामुळे हा नियम पाळावा, अन्यथा घरावर संकटं ओढावतात.