Pitru Paksha 2024 : पितृपक्षात जन्माला आलेली मुलं खरंच पूर्वजांचं रुप असतात? जाणून घ्या ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय...
पितृपक्ष किंवा श्राद्धाच्या 15 दिवसांत कोणतंच शुभ कार्य केलं जात नाही. हे श्राद्धाचे 15 दिवस पूर्णपणे पितरांना समर्पित असतात. जेणेकरुन, पितरांच्या आत्म्यास शांती मिळावी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशातच जी मुलं पितृपक्षात जन्माला येतात त्यांचं भविष्य कसं असतं हे जाणून घेण्याची उत्सुकता असते.
पितृपक्षात किंवा श्राद्धात बाळ जन्माला येणं फार शुभ मानलं जातं. ही मुलं फक्त लकीच नसतात तर आपल्या कुटुंबियांसाठी देखील लकी असतात. ही मुलं मोठी होऊन खूप प्रगती करतात.
श्राद्धात जन्मलेल्या मुलांवर पितरांचा विशेष आशीर्वाद असतो. असं म्हणतात की, ही मुलं आपल्या कुटुंबात आनंद घेऊन येतात. लहान वयातच ही मुलं फार समजूतदार असतात. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ही मुलं इतरांचं मन जिंकतात.
पितृपक्षात जन्मलेल्या मुलांमध्ये फार लहान वयापासूनच जबाबदारीची भावना निर्माण होते. ते आपल्या कुटुंबियांची खूप काळजी घेतात. वाईट सवयींपासून ही मुलं फार लांब असतात.
पितृपक्षात जन्मलेल्या मुलांमध्ये चंद्र ग्रह कमजोर असतो. यामुळे ते फार भावूक असतात.अनेकदा हे लोक तणावाचे कारण ठरतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)