Paush Putrada Ekadashi 2025 : पौष पुत्रदा एकादशीला चुकूनही खाऊ नका 'या' 3 गोष्टी; घरात येईल दुर्दैव
Paush Putrda Ekadashi 2025 : हिंदू धर्म मान्यतेनुसार, इतर व्रतांपेक्षा पौष पुत्रदा एकादशीचं व्रत जास्त महत्त्वाचं असते.
Continues below advertisement
Paush Putrda Ekadashi 2025
Continues below advertisement
1/9
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, पौष पुत्रदा एकादशीचं व्रत हे संतानप्राप्तीसाठी केलं जातं.हे व्रत केल्याने संतानप्राप्ती होते अशी पौराणिक मान्यता आहे.
2/9
तसेच, या व्रतामुळे घरात सुख-शांती लाभते, धनसंपत्तीत भरभराट होते. मात्र, हे व्रत जितके फलदायी असते तितकेच कठीण असते. या व्रताचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे असते.
3/9
हिंदू धर्मशास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे की, पौष पुत्रदा एकादशीला फक्त पूजा नाही तर या दिवशी उपवास करावा. आणि इतर गोष्टींचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत. जर या नियमांचं पालन केलं नाही तर त्याचं फळ मिळणार नाही.
4/9
हिंदू धर्मानुसार इतर व्रतांपेक्षा पौष पुत्रदा एकादशीचं व्रत जास्त महत्त्वाचं असते. पौष महिन्याच्या शुक्लपक्ष एकादशीची सुरवात 30 डिसेंबर सकाळी 6 वाजून 38 मिनिटांवर सुरु होईल आणि दुसऱ्या दिवशी 31 डिसेंबरला 4 वाजून 38 मिनिटांनी संपेल.
5/9
नियमांप्रमाणे या दिवशी चुकूनही या तीन गोष्टी करू नये, जर नियमांचे उल्लंघन झाले तर भगवान विष्णू नाराज होतील आणि फळप्राप्ती होणार नाही.
Continues below advertisement
6/9
पौष पुत्रदा एकादशीचे व्रत करताना भाताचे सेवन करू नये. शास्त्रानुसार असे मानले जाते या दिवशी भाताचे सेवन केल्याने ग्रहदोष लागतो.
7/9
या एकादशीचे व्रत करताना मांसाहारी पदार्थांचे सेवन टाळावे, मद्यपान करू नये, धूम्रपण करू नये. मांस खाल्ल्याने किंवा मद्यपान केल्यास भगवान विष्णू नाराज होतात. त्यामुळे व्रत पूर्ण होऊ शकत नाही.
8/9
भगवान विष्णूला तुळशीपत्र पूजेमध्ये वाहतात कारण ते त्यांना प्रिय आहे, पण पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडू नये.
9/9
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 23 Dec 2025 02:42 PM (IST)