Pandharpur News : पुढच्या शेकडो वर्षांसाठी विठुराया विसावला नवीन मेघडांबरीत; भक्ताकडून दोन कोटी रुपयांची चांदी अर्पण
विठ्ठल मंदिर संवर्धनाच्या कामात विठ्ठल गाभाऱ्यातील जुनी खराब झालेली मेघडांबरी बदलून 190 किलो चांदी वापरून तयार केलेल्या नव्या मेघडांबरीत विठ्ठल रुक्मिणी पुढील शेकडो वर्षासाठी विसावले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया चांदीच्या मेघडांबरीला अतिशय बारीक पुरातन पद्धतीचे नक्षीकाम केलं आहे असं या फोटोच्या माध्यमातून दिसतंय.
समोरच्या बाजूला या नक्षिकामावर सोन्याचा मुलामा दिल्याने विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यात शोभा आली आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन संवर्धन काम सुरू असताना पूर्वीच्या काळी बसवलेली मेघडांबरी खराब झाली होती. त्यामुळे मंदिर समितीने नवीन मेघडांबरी बसविण्याचा निर्णय घेतला होता.
विष्णुदास कबीर महाराज यांनी यासाठी सागवानी लाकूड उपलब्ध करून मेघडांबरी बनवून दिली.
मराठवाड्यातील मोघरे या भक्ताने मेघडांबरीसाठी जवळपास दोन कोटी रुपयांची चांदी अर्पण केल्यावर या लाकडी मेघडांबरीवर 20 गेज जाडीच्या चांदीचा पत्रा बसविण्यात आला होता.
यासाठी पुण्यात दीड महिना सुटे भाग बनवून मंदिरात आणून ते बसविण्यात आले.
आज पहाटे ही मेघडांबरी विधिवत पूजन करून समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या उपस्थितीत बसवली. यामुळे देवाच्या गाभाऱ्यास पूर्वी प्रमाणे शोभा प्राप्त झाली आहे.