Osmanabad : तुळजाभवानी देवीला आज चंद्रग्रहणावेळी सोवळ्यात ठेवणार; देवीच्या पूजा विधीच्या वेळेतही बदल
Osmanabad News : ग्रहण कालावधीत देवीच्या नित्योपचार धार्मिक पूजा विधीत बदल करण्यात आला आहे.

Osmanabad News
1/7
चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आज तुळजाभवानी मातेचा धार्मिक विधीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तसेच रात्री 9.57 ते 1.30 या ग्रहण कालावधीत तुळजाभवानी मातेला शुभ्र श्वेत सोवळ्यात ठेवण्यात येणार आहे.
2/7
शिवाय ग्रहण कालावधीत देवीच्या नित्योपचार धार्मिक पूजा विधीत बदल करण्यात आला आहे. तसेच, ग्रहण सुटल्यानंतर सोमवारी पहाटे 1.30 वाजता पंचामृत स्नान , शुद्ध स्नान आरती आणि धुपारती होईल. तर सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून नित्याची पूजा होईल.
3/7
सायंकाळी साडेसहा वाजता अभिषेक पूजेची घाट होऊन अभिषेक पूजेस प्रारंभ होणार आहे. यावेळी केवळ सायंकाळी दोन सिंहासन पूजा घालण्यात येतील .
4/7
रात्री साडेसात वाजता अभिषेक पूजा संपवण्यात येणार आहे.रात्री साडेसात ते आठ या कालावधीत आरती धूपारती होईल.
5/7
रात्री आठ वाजता पौर्णिमेनिमित्त देवीची छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे.रात्री साडेआठ ते साडेनऊ वाजेपर्यंत जोगवा आणि प्राक्षळ पूजेनंतर मंदिर बंद केलं जाणार आहे. रात्री 9.30 ते 9.45 चरणतीर्थ असेल.
6/7
रात्री नऊ वाजून 57 मिनिट ते दीड वाजेपर्यंत चंद्रग्रहण कालावधीत देवीला सोवळ्यात ठेवलं जाईल.
7/7
तर देवीची सकाळी नित्याची पूजा सोमवारी सकाळी सहा वाजता सुरू होईल
Published at : 07 Sep 2025 02:13 PM (IST)