Numerology : इमोशनली इंटेलिजेंट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; स्वभावाने एकदम 'लॉयल पार्टनर'
ज्याप्रमाणे राशीनुसार एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ठरवला जातो. त्याप्रमाणेच, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा स्वभाव ठरवला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. अंकज्योतिषशास्त्रानुसार, मूलांक 2 च्या व्यक्ती खूप खास असतात.
मान्यतेनुसार, मूलांक 2 चा स्वामी ग्रह चंद्र आहे. मूलांक 2 असलेले व्यक्ती फार शांत, बुद्धिमान आणि भावूक स्वभावाच्या असतात.
मूलांक 2 असणारे व्यक्ती फार बुद्धिमान आणि समजूतदार असतात. या जन्मतारखेच्या लोकांची लीडरशिप क्वालिटी फार चांगली असते.
तसेच, स्वत: पुढे जाण्याबरोबरच इतरांनाही मदत करण्याच्या यांच्या स्वभावामुळे हे लोक इतरांचे चांगले मित्र होतात.
या जन्मतारखेचे लोक प्रेमाच्या बाबतीत फार लकी असतात. तसेच, आपल्या जोडीदाराप्रती फारच लॉयल असतात.
या जन्मतारखेचे लोक इतरांच्या भावनांचा आणि निर्णयाचा फार सन्मान करतात. ज्यामुळे यांच्याकडे इतर लोक लगेच आकर्षित होतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)