Numerology : प्रचंड हट्टी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हवी ती गोष्ट मिळवूनच राहतात, त्याशिवाय मिळत नाही यांना शांती

Numerology : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक अतिशय महत्त्वाकांक्षी देखील असतात. हे लोक हट्टी असतात, ठरवलं ते करुनच राहतात. हवी असलेली गोष्ट मिळाली नाही तर ते अग्नितांडव करतात.

Numerology Mulank 3

1/10
मूलांक 3 चे लोक अत्यंत जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी असतात. मूलांक 2 चा शासक ग्रह बृहस्पति आहे, जो सर्व ग्रहांचा गुरू मानला जातो. 3, 12, 21 किंवा 30 जन्मतारखेचे लोक स्वतंत्र विचाराचे असतात.
2/10
हवं ते मिळवण्याची जिद्द त्यांच्यात असते. या मूलांकाचे लोक धैर्यवान, शूर आणि सामर्थ्यवान असतात. मूलांक 3 शी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
3/10
कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेले लोक हे स्वभावाने प्रचंड हट्टी असतात. त्यांना एखादी गोष्ट हवी असेल तर ते ती मिळवूनच राहतात.
4/10
जोपर्यंत हवी असलेली गोष्ट मिळत नाही तोपर्यंत यांना शांत बसवत नाही आणि ते अस्वस्थ होतात. त्यांना अपेक्षित गोष्टी घडल्या नाही अथवा मिळाल्या नाही तर त्यांची चिडचिड होते.
5/10
मूलांक 3 असलेले लोक खूप स्वाभिमानी असतात. या लोकांना कुणासमोर झुकायला आवडत नाही. या मूलांकाच्या लोकांना कोणाचेही उपकार नको असतात किंवा त्यांना त्यांच्या कामात कोणाचा अनावश्यक हस्तक्षेपही आवडत नाही.
6/10
मूलांक 3 चे खूप महत्वाकांक्षी असतात, त्यांची स्वप्नं मोठी असतात. त्यांच्या ध्येयाप्रती ते एकनिष्ठ असतात. मोठ्या मोठ्या गोष्टी साध्य करण्याची हिंमत त्यांच्यात असते.
7/10
आपल्या प्रयत्नांच्या जोरावर ते हवं ते सर्व साध्य करतात. या मूलांकाचे लोक त्यांच्या स्वातंत्र्याशी कधीही तडजोड करत नाहीत.
8/10
हे लोक खूप महत्वाकांक्षी असण्यासोबतच चांगले विचार करणारे देखील असतात.
9/10
मूलांक 3 असलेले लोक उच्च शिक्षण घेतात. हे लोक खूप अभ्यासू असतात, वाचन आणि लेखनात ते खूप हुशार असतात.
10/10
या लोकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. अनेकदा या लोकांना घरून आर्थिक मदत घ्यावी लागते. वाढत्या वयाबरोबर त्यांची आर्थिक स्थिती सुधारू लागते.
Sponsored Links by Taboola