Numerology : अत्यंत भोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही अगदी सहज जातं यांना फसवून, नंतर करतात पश्चाताप
मूलांक 2 चे लोक हे स्वभावाने अत्यंत साधेभोळे असतात. अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशिष्ट गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 2 असलेल्या लोकांची देखील काही खास वैशिष्ट्यं सांगितली गेली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 च्या लोकांमध्ये आत्मविश्वासाचीही थोडी कमतरता जाणवते.
मूलांक 2 चे लोक अत्यंत भोळे असतात, त्यांचं मन नाजूक असतं आणि ते हळव्या स्वभावाचे देखील असतात. मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र (Moon) आहे, त्यामुळे स्वभावाने ते चंद्रासारखेच कोमल असतात.
2, 11, 20 किंवा 29 जन्मतारखेचे लोक अत्यंत भावनिक, दयाळू आणि साध्या मनाचे असतात. या स्वभावामुळेच कधीकधी लोक यांचा फायदा घेतात.
मूलांक 2 च्या लोकांमध्ये निर्णय क्षमता कमी असते. हे लोक लगेच निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना पटकन काही बोलता येत नाही.
मूलांक 2 च्या लोकांमध्ये अनेक वेळा एकाग्रतेचा अभावही दिसून येतो.
या मूलांकाचे लोक स्वभावाने खूप शांत आणि सहनशील असतात. अगदी कठीण परिस्थिती जरी आली तरी हे लोक आपला संयम गमावत नाहीत. उलट धैर्याने परिस्थितीचा सामना करतात.
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेले जन्मलेले लोक हे स्वभावाने अत्यंत भोळे असतात. हे लोक कोणाच्याही बोलण्यात लगेच फसतात. अनेक लोक यांचा गैरवापर करुन घेतात, स्वत:च्या फायद्यासाठी लोक यांचा वापर करतात.
मूलांक 2 चे लोक प्रचंड हळव्या मनाचे असतात, त्यामुळे त्यांना कधीकधी मोठे निर्णय घेण्यात अडचणी येतात. समोरचा व्यक्ती एखाद्या संकटात असेल तर यांना लगेच भरुन येतं आणि मदतीसाठी ते पुढे सरसावतात.
2, 11, 20 किंवा 29 जन्मतारखेचे लोक नेहमी कोणावर तरी अवलंबून राहतात. एकतर ते त्यांच्या जोडीदारावर किंवा इतर कोणावर तरी अवलंबून असतात. या लोकांना त्यांच्या कामात नेहमीच प्रोत्साहानाची, सहकार्याची गरज असते.