Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
मूलांक 2 चे लोक छोट्या-छोट्या गोष्टींचं टेन्शन घेतात. कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र आहे, त्यामुळे चंद्राच्या प्रभावामुळे हे लोक साध्या मनाचे असतात. या मूलांकाचे लोक अत्यंत कल्पनाशील, भावनिक आणि दयाळू असतात.
2, 11, 20 किंवा 29 जन्मतारखेचे लोक हे ओव्हरथिंकर्स असतात. अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीवर ते तासनतास विचार करत बसतात. कोणतीही गोष्ट यांच्या डोक्यातून सहज निघत नाही.
मूलांक 2 चे व्यक्ती पटकन शांत होत नाहीत, यांच्यासोबत राहणाऱ्या मंडळींचा अर्धा वेळ यांना शांत करण्यात जातो.
मूलांक 2 च्या व्यक्ती या फार ताण घेतात. नको त्या गोष्टींचा विचार करुन ते स्वत:चं टेन्शन वाढवतात. नको त्या गोष्टींना, व्यक्तींना महत्त्व दिल्याने त्यांची डोकेदुखी वाढते. अति ताण घेतल्याने याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर देखील होतो.
2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची थोडी कमतरता जाणवते. हे लोक लगेच निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना पटकन काही बोलता येत नाही.
मूलांक 2 चे लोक स्वभावाने खूप शांत आणि सहनशील असतात. अगदी कठीण परिस्थिती जरी आली तरी हे लोक आपला संयम गमावत नाहीत.
धैर्याने परिस्थितीचा सामना करणं यांना जमतं. हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात.
2, 11, 20 किंवा 29 जन्मतारीख असलेले लोक नोकरी-व्यवसायात खूप नाव कमावतात. ते संगीत, गायन, लेखन, कला इत्यादी क्षेत्रातही चांगली कामगिरी करतात.
मृदुभाषी असल्या कारणाने या लोकांची समाजात चांगली प्रतिमा निर्माण होते. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)