Numerology : अतिशय हुशार असतात 'या' जन्मतारखेचे लोक; सर्वांच्या मनावर करतात राज्य, चुटकीसरशी सोडवतात सगळे प्रॉब्लेम

Numerology : ज्योतिषशास्त्रानुसार, या जन्मतारखेचे लोक डोक्याने फार हुशार असतात. हे लोक चांगल्या मनाचे असतात, परंतु यांच्यात आत्मविश्वासाची थोडी कमी जाणवते.

Continues below advertisement

Numerology mulank 2 nature

Continues below advertisement
1/11
अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये मूलांक 2 असलेल्या लोकांची काही खास वैशिष्ट्यं सांगण्यात आली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो.
2/11
मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र आहे. त्यामुळे चंद्राच्या प्रभावामुळे, या मूलांकाचे लोक अत्यंत शांत, दयाळू आणि साध्या मनाचे असतात. या लोकांच्या मनात खोट नसते.
3/11
2, 11, 20 किंवा 29 जन्मतारखेचे लोक हे फार हुशार असतात. बौद्धिक कार्यांत यांचं डोकं फार चालतं, त्यांच्या या गुणामुळे सर्वत्र त्यांचं कौतुक होतं.
4/11
मूलांक 2 चे लोक पै पै करुन पैसा जमा करतात. या लोकांना पैशांची किंमत कळते, म्हणून ते जास्त उधळपट्टी करत नाहीत.
5/11
मूलांक 2 च्या काही लोकांमध्ये आत्मविश्वासाची थोडी कमतरता जाणवते. हे लोक लगेच निर्णय घेऊ शकत नाहीत.
Continues below advertisement
6/11
त्यांना पटकन काही बोलता येत नाही. तसेच त्यांचा स्वभावही सतत बदलणारा असतो.
7/11
2, 11, 20 किंवा 29 जन्मतारखेच्या लोकांमध्ये अनेक वेळा एकाग्रतेचा अभावही दिसून येतो.
8/11
मूलांक क्रमांक 2 असलेले लोक नोकरी-व्यवसायात खूप नाव कमावतात.
9/11
ते संगीत, गायन, लेखन, कला इत्यादी क्षेत्रातही चांगली कामगिरी करतात. मृदुभाषी असल्या कारणाने या लोकांची समाजात चांगली प्रतिमा निर्माण होते.
10/11
या मूलांकाचे लोक स्वभावाने खूप शांत आणि सहनशील असतात. अगदी कठीण परिस्थिती जरी आली तरी हे लोक आपला संयम गमावत नाहीत. उलट धैर्याने परिस्थितीचा सामना करतात.
11/11
या जन्मतारखेचे लोक इतरांशी समन्वय साधण्यात पटाईत असतात. हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात.
Sponsored Links by Taboola