Vastu Tips : चुकूनही घरात ठेवू नका 'या' देवाचा फोटो, नकारात्मक ऊर्जा येऊन होईल मोठं नुकसान
Is It Good to Keep Shani Idol at Home : हिंदू धर्मानुसार, घरात छोटं मंदिर किंवा देव्हारा असतो, ज्यामध्ये विविध देवीदेवतांचे फोटो ठेवून त्यांची पूजा केली जाते. सनातन धर्मानुसार, देवीदेवतांच्या फोटो किंवा मूर्तीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन मन प्रसन्न राहते, असं मानलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, शास्त्रानुसार, एका देवाचा फोटो देवघरात किंवा घरात ठेवणे वर्ज्य आहे. या देवतेची प्रतिमा घरात ठेवल्यास नकारात्म ऊर्जा येते आणि याचा वाईट परिणाम होतो, असं मानलं जातं.
वास्तु शास्त्रानुसार, जर तुम्ही नकळत या देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा घरी आणली तर तुमचं नुकसान व्हायला वेळ लागणार नाही. या प्रतिमेमुळे अशुभ परिणाम होऊन तुम्हाला व्यवसायात नुकसान होण्याची किंवा तुमची नोकरी जाण्याची भीती आहे. याशिवाय, तुमचा व्यवसाय ठप्प व्हायला वेळ लागणार नाही.
शास्त्रानुसार, याच्या प्रभावामुळे कुटुंबातील कलह वाढतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे होतील. नकारात्मक ऊर्जा तयार होईल, असं वास्तु शास्त्रात सांगितलं आहे. वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये शनि देवाची प्रतिमा किंवा मूर्ती घरात आणणे वर्जित आहे. शनि देव प्राण्याचे कर्म पाहून त्यानुसार, त्यांना फळ देणारे मानले जातात. त्यांच्या स्वभाव निष्ठूर असतो.
शनिदेवाला एकदा शाप देण्यात आला होता की, तो ज्याच्याकडे पाहील त्याच्यावर वाईट होईल. यामुळेच घरात आणि देवघरात शनीची मूर्ती ठेवणे निषिद्ध मानले जाते. जे लोक असे करतात, त्यांना वाईट परिणाम भोगावे लागतात.
ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेवाची मूर्ती घरात ठेवण्याची चूक कोणत्याही व्यक्तीने करू नये. त्यांची ही छोटीशी चूक त्यांच्या पतनाचे मोठे कारण बनू शकते आणि त्यांच्या कष्टाने कमावलेले नुकसान होऊ शकते.
केवळ मूर्ती घरी आणण्यासोबतच शनि मंदिरात जाऊन शनीचे दर्शन घेण्याचेही अनेक नियम आहेत, ज्यांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.
शास्त्रानुसार, शनि मंदिरात कधीही शनिदेवाच्या समोर उभे राहू नये. त्याऐवजी तुम्ही नेहमी मूर्तीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला उभे राहावे. यामुळे तुम्ही शनिदेवाच्या दृष्टीक्षेपात येणार नाही.
दर्शन करताना कधीही शनि देवाच्या डोळ्यात पाहू नका, त्याच्या गळ्यापासून खालील मूर्तीकडे पाहा. असे केल्याने तुम्हाला त्यांच्या दृष्टीच्या संपर्कात येण्यापासून संरक्षण मिळेल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.