Mumbai : चंद्रग्रहणाचे वेध लागले, सिद्धिविनायकाच्या गाभाऱ्याचे दार बंद झाले; पाहा PHOTOS
Mumbai : मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात चंद्रग्रहणाचा सूतक काळ लागल्याने मंदिराची दारं बंद ठेवण्यात आली आहेत.
Continues below advertisement
Mumbai Siddhivinayak Temple
Continues below advertisement
1/10
आज वर्षातील दुसरे आणि सर्वात मोठं चंद्रग्रहण असणार आहे. विशेष म्हणजेच हे चंद्रग्रहण भारतात देखील दिसणार आहे.
2/10
चंद्रग्रहणाचा सूतक काळ भारतात लागू असल्या कारणाने चंद्रग्रहणाच्या दिवशी अनेक मंदिरांची कपाटं बंद ठेवण्यात आली आहेत.
3/10
खग्रास चंद्रग्रहणामुळे सिद्धिविनायकाच्या शयन आरतीच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे.
4/10
रात्री 9.57 वा ग्रहण चालू होत असल्यामुळे गणपतीची शयन आरती रात्री 1 वाजून 57 मिनिटांनंतर होणार आहे. नेहमीची आरती ग्रहण संपल्यानंतर म्हणजेच रात्री दीडच्या सुमारास होणार आहे.
5/10
सूतक काळ लागल्याने मंदिराची दारं बंद ठेवण्यात आली आहेत.
Continues below advertisement
6/10
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देखील चंद्रग्रहणाच्या वेळी जलाभिषेक आणि मंत्रजाप सुरु असणार आहे.
7/10
या ठिकाणी भक्तांनी नेहमीच गर्दी असते. त्यामुळे मंदिराची कपाटं बंद केली जाणार नाहीत. भाविकांना मुखदर्शन करता येणार आहे.
8/10
मात्र, गर्भग्रहात कोणत्याच प्रकारचा नैवेद्य दाखवता येणार नाही.
9/10
सिद्धिविनायकाच्या गाभाऱ्याची सारी कपाटं बंद करण्यात आली आहेत.
10/10
सूतक काळात भक्तांना सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येणार नाही. चंद्रग्रहण आणि पितृपक्ष देखील एकाच दिवशी असल्या कारणाने हा दिवस फार प्रभावी मानला जातोय.
Published at : 07 Sep 2025 01:06 PM (IST)