Morning Tips : सकाळी उठल्यानंतर 'या' 5 गोष्टींना पाहणं अत्यंत अशुभ!संपूर्ण दिवसभर होईल परिणाम
सकाळी उठल्यानंतर आरशात पाहण्याची आणि चेहरा पाहण्याची अनेकांना सवय असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर आरसा पाहणे अशुभ मानले जाते. यामुळे तुम्हाला नकारात्मकतेचा सामना करावा लागू शकतो.
सकाळी उठल्यावर चुकूनही स्वतःचे किंवा दुसऱ्याची सावली दिसू नये, हे अशुभ मानले जाते.
मान्यतेनुसार कामात अडथळ्यांना सामोरे जावे लागते आणि अपयशाला सामोरे जावे लागते.
शास्त्रानुसार सकाळी लवकर उठून तडा गेलेली मूर्ती पाहू नये. यामुळे तुम्हाला दिवसभर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणतीही तुटलेली मूर्ती नसावी, जर तुमच्या घरात असेल तर ती लगेच बाहेर फेकून द्या.
अनेकांना रात्री जेवण झाल्यावर भांडी स्वयंपाकघरात ठेवण्याची सवय असते. असे करणे अत्यंत अशुभ आहे.
सकाळी घाण भांडी पाहिल्यास आर्थिक अडचणी येऊ शकतात. तुम्हाला देवी लक्ष्मीच्या नाराजीलाही सामोरे जावे लागू शकते.
सकाळी उठल्यावर वन्य प्राण्यांचे फोटो पाहणे टाळावे. यामुळे तुमचा दिवस वादात जाऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)