Shirdi Sai Baba Mandir : शिर्डीत साई भक्ताकडून पाऊण किलोचा सुवर्णमुकुट दान; किंमत नेमकी किती?
Shirdi Sai Baba Mandir : साईबाबांचे भक्त संपूर्ण जगभरात असल्याने शिर्डीत साईंच्या चरणी दर्शन घेण्यासाठी संपूर्ण जगभरातून भाविक शिर्डीला सातत्याने येतात.
Shirdi Sai Baba Mandir
1/9
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविकांची गर्दी जमलेली असते.
2/9
साईबाबांचे भक्त संपूर्ण जगभरात असल्याने शिर्डीत साईंच्या चरणी दर्शन घेण्यासाठी संपूर्ण जगभरातून भाविक शिर्डीला सातत्याने येतात.
3/9
या दरम्यान हजारो भाविक साईंच्या चरणी दागिने, पैसे, अलंकार अशा अनेक गोष्टींचं दान करतात.
4/9
नुकताच साई चरणी 42 लाख 80 हजार रुपये किंमतीचा सुवर्णमुकुट दान करण्यात आला आहे.
5/9
एका दानशूर साईभक्ताकडून 648 ग्रॅम वजनाचा सुवर्णमुकुट दान करण्यात आला आहे.
6/9
या मुकुटावर सुंदर, बारीक आणि आकर्षक अशी डिझाईन करण्यात आली आहे.
7/9
साई मूर्तीला परिधान करण्यात आलेल्या या मुकुटाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.
8/9
दरम्यान या साईंच्या चरणी दान केलेल्या या देणगीदाराने आपलं नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे.
9/9
तर, जेव्हा शिर्डीच्या साईबाबांना हा मुकुट प्रत्यक्षात चढविण्यात येईल तेव्हा त्यांचं रूप अधिक खुलून दिसेल यात शंकाच नाही.
Published at : 16 Jun 2024 01:44 PM (IST)