Pandharpur : कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेला आचारसंहितेचा फटका; यंदा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा नाही, पूजेचे मानकरी कोण?
कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा दरवर्षी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. परंतु यंदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहित लागल्याने ही परंपरा खंडित होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याऐवजी आता उद्या होत असलेल्या कार्तिकी एकादशी सोहळ्यास देवाची महापूजा राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक किंवा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या ऐवजी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या हस्ते संपन्न होणार आहे.
यावेळीही मानाचा वारकरी दाम्पत्य पूजेत सहभागी होणार असून उद्याची शासकीय महापूजा कोणता अधिकारी करणार याबाबत अजून प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही.
कार्तिकी सोहळ्यासाठी आज दशमीला जवळपास पाच ते सहा लाख भाविक दाखल झाले असून विठुरायाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर पत्रा शेडपर्यंत पोहोचली आहे.
उद्या पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी विठुराया आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा होणार आहे.
कार्तिकी एकादशीनिमित्त मंदिर समितीने विठ्ठल मंदिर आणि परिसरात रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर उजळून निघाला आहे.
कार्तिकीसाठी येणाऱ्या भाविकांना विक्रीसाठी आठ लाख बुंदीच्या लाडूचा प्रसाद बनवण्यात आला आहे.
शहरातील विविध भागात यात्रेवर लक्ष ठेवण्यासाठी 120 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून जवळपास 1600 पोलीस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आलेला आहे.
कार्तिकी यात्रेमुळे शहरातून जाणारी सर्व वाहतूक बाह्य वळणाने वळवल्याने भाविकांना मोकळा श्वास घेता येत आहे.