Holashtak 2025 : ...म्हणून होलाष्टकाच्या दिवशी गृह प्रवेश केला जात नाही; वाचा वास्तूशास्त्रात नेमकं काय म्हटलंय...

Holashtak 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, होळीची सुरुवात होलाष्टकपासून केली जाते. होलाष्टकाच्या दरम्यान गृह प्रवेश तसेच, अन्य काही शुभ कार्य करणं अशुभ मानलं जातं.

Holashtak 2025

1/7
2025 या वर्षात 14 मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे. मात्र होलाष्टक होळीच्या आठ दिवसांआधीच लागतं. होलाष्टकाच्या दरम्यान शुभ कार्य करण्यास सक्त मनाई केली जाते.
2/7
त्यानुसार, 7 मार्चपासून होलाष्टकाचा काळ सुरु होणार आहे. होलाष्टकाचा अर्थ होळी आणि अष्टक म्हणजेच होळीचे आठ दिवस. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीपासून ते पौर्णिमा तिथीपर्यंत होलाष्टकाचा काळ असतो.
3/7
वास्तू शास्त्रानुसार, या दरम्यान गृह प्रवेश केला जात नाही. होलाष्टकाच्या दरम्यान आठ ग्रह अशुभ फळ देतात. या काळात ग्रहांची स्थिती शुभ कार्य करण्यास अनुकूल मनाली जात नाही.
4/7
होलाष्टकाच्या दरम्यान घर बांधणे, गृह प्रवेश करणे यांसारखी शुभ कार्य करणं वर्जित मानलं जातं. वास्तू शास्त्रानुसार, या दिवशी कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही.
5/7
जर तुम्ही या दिवशी गृह प्रवेश कराल तर तुमच्या शुभ कार्यावर होलाष्टकाचा गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच या दरम्यान कोणतंही शुभ कार्य करु नये. अन्यथा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
6/7
यासाठीच होलाष्टकाच्या दरम्यान गृह प्रवेश किंवा अन्य शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते.
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola