Guru Gochar 2025 : मे महिन्यात 'या' 2 राशींवर असणार गुरु ग्रहाचा निशाणा; संक्रमणामुळे आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम, वेळीच सावध व्हा

Guru Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु ग्रह 14 मे 2025 रोजी रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी मिथुन राशीत संक्रमण करणार आहे.

Guru Gochar 2025

1/7
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवग्रहांमध्ये गुरु ग्रहाच्या संक्रमणाला देखील महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. मे महिन्यात गुरु राशी परिवर्तन करणार आहे. त्यामुळे या दरम्यान काही राशींच्या लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
2/7
ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु ग्रह 14 मे 2025 रोजी रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी मिथुन राशीत संक्रमण करणार आहे. त्यानंतर 18 ऑक्टोबर रोजी गुरु कर्क राशीत प्रवेश करणार आहे.गुरु ग्रह हा सुख-समृद्धी, ऐश्वर्य, ज्ञान आणि गुरुचा कारक ग्रह मानला जातो.
3/7
कर्क राशीच्या लोकांनी या काळात आपल्या आरोग्यावर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. तसेच, या काळात कोणत्यात प्रकारचा तणाव घेऊ नका. कामाच्या ठिकाणी अनेकजण तुमची परीक्षा घेऊ शकतात. त्यामुळे मानसिक तमाव जाणवू शकतो. तसेच, आरोग्याचीही काळजी घ्या.
4/7
मिथुन राशीच्या लोकांसाठी हे ग्रह संक्रमण फारसं शुभकारक नसणार आहे. या काळात तुमच्या मनात अनेक नकारात्मक विचार येऊ शकतात. तुमचं मन बैचेन असेल. त्यामुळे या काळात तुमच्यासाठी योग, ध्यान करणं गरजेचं आहे. अन्यथाल तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
5/7
गुरु ग्रह कमजोर झाल्यास व्यक्तीला पोटाच्या संबंधित समस्या जाणवू शकतात. यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
6/7
गुरु ग्रहाला सर्वात मजबूत ठेवायचं असेल तर गुरुवारच्या दिवशी केळ्याच्या झाडाची पूजा करा. तसेच, गूळ आणि चण्याचा नैवेद्य दाखवा. तसेच, संध्याकाळच्या वेळी तुपाचा दिवा लावावा.
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola