Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्याला उभारलेली गुढी कधी आणि कशी उतरवायची? जाणून घ्या ज्योतिष शास्त्रानुसार गुढी उतरवण्याचा मुहूर्त

Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्याच्या दिवशी जशी गुढी उभारणं महत्त्वाचं आहे. तशीच ती गुढी उतरवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.

Gudi Padwa 2025

1/10
हिंदू संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण म्हणजेच गुढीपाडवा. आज म्हणजेच 30 मार्च 2025 रोजी देशभरात गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातोय.
2/10
या दिवशी सर्व घरांमध्ये सकाळी लवकर गुढ्या उभारल्या जातात. येणारं मराठी नवंवर्ष आनंदात, आणि सुख-समृद्धीत जावं, आपल्याला निरोगी आरोग्य लाभावं यासाठी प्रार्थना केली जाते.
3/10
नवीन वर्ष यशस्वी होवो आणि यशाची गुढी सदैव उंच राहो, अशी प्रार्थना या दिवशी करतात.
4/10
गुढीपाडव्याच्या दिवशी जशी गुढी उभारणं महत्त्वाचं आहे. तशीच ती गुढी उतरवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.
5/10
त्यामुळे गुढी कधी आणि कशी उतरवायची असा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर या ठिकाणी आपण याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
6/10
सकाळी गुढी उभारल्यानंतर, संध्याकाळी सूर्यास्ताच्या पूर्वी गुढी उतरवणं गरजेचं असतं.
7/10
यंदा गुढी उतरवण्याचा मुहूर्त संध्याकाळी 06.37 ते 07.00 असा आहे. या वेळेत तुम्ही गुढी काढू शकता.
8/10
गुढी उतरवताना सकाळी ज्या पद्धतीने विधीवत पूजा केली जाते. तसेच, संध्याकाळी गोड नैवेद्य दाखवून आरती करुन गुढी उतरवायची असते.
9/10
गुढीसाठी वापरलेली साडी घरातील स्त्रिया वापरु शकतात. गुढीसाठी वापरलेले वस्त्र छोटे असल्यास ते मंदिरात दान करावेत.
10/10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola