गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर दुर्वा अन् नारळाचं काय करायचं?; जाणून घ्या तुमच्या भल्याची गोष्ट
महाराष्ट्रात सध्या मोठ्या उत्साहात गणेशोस्तव साजरा करण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाल मुंबईसह राज्यात गौरी-गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. भक्तीमय रुपाय गणरायाला निरोप देण्यात येत आहे.
याचदरम्यान गणरायाचे विसर्जन केल्यानंतर दुर्वा आणि नारळाचे नेमकं काय करावे, याबाबत जाणून घ्या...
गणरायाच्या विसर्जनानंतर गणेश चतुर्थीदिवशी कलशात ठेवलेलं पाणी संपूर्ण घरात शिंपडावे आणि उरलेलं पाणी पिंपळ, वडाच्या झाडांना ओतावे. तसेच कलशामधील पाणी घरातील तुळस आणि इतर कुंडीतही टाकू शकतात. यामुळे घरात सुख-समृद्धी राहते.
गणेश विसर्जनाच्या दिवशी पूजेच्यावेळी गणरायाला दुर्वा अर्पण करा. तसेच यामधील थोडी दु्र्वा घरातील कपाटात (पैसे ठेवण्याची जागा) ठेवा. यामुळे कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि पैशाची कमतरता दूर होते.
गणेश विसर्जनावेळी कलशावर जो नारळ ठेवतो, किंवा गणरायाची प्राणप्रतिष्ठा करताना जो नारळ गणरायाजवळ ठेवण्यात येतो, तो फोडून सर्वांना प्रसाद म्हणून द्या...
अनंत चतुर्दशीचा दिवस गणेश विसर्जनासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी गणेश उत्सवाला 10 दिवस पूर्ण होतात.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणराय भाविकांचा निरोप घेतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)