Ganesh Visarjan 2024 : बाप्पाचं विसर्जन करताना 'या' मंत्रांचा करा जप; वर्षभर राहील बाप्पाची कृपा
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचं विसर्जन केलं जातं. ज्या जल्लोषात बाप्पााला घरी आणलं जातं त्याच पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं विसर्जन केलं जातं. त्याचबरोबर पुढच्या वर्षी लवकर या म्हटलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही मंत्रांचा जप करणं फार महत्त्वाचं असतं. या मंत्रांशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते.
गणपती विसर्जना दरम्यान कोणत्या मंत्रांचा जप करावा हे जाणून घेऊयात.
तुमच्यावर देखील बाप्पाचा आशीर्वाद राहावा असं वाटत असेल तर या दरम्यान ''ॐ यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्। इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥''या मंत्राचा जप करा.
त्याचबरोबर'ॐ मोदाय नम:' या मंत्राचा जप केल्याने वर्षभर बाप्पाची कृपा आपल्यावर राहते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)