Ganesh Visarjan 2024 : मंगळवारी गणपतीचं विसर्जन करणं योग्य की अयोग्य? शास्त्र सांगते...
दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतो. यंदा अनंत चतुर्दशी मंगळवारी, 17 सप्टेंबरला आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंगळवार हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे आणि नेमकी या दिवशीच अनंत चतुर्दशी आली आहे.
ज्या दिवशी गणपतीची भक्तिभावाने पूजा केली जाते, त्या मंगळवारच्या दिवशी बाप्पाचं विसर्जन करणं योग्य आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मंगळवारी गणपती बाप्पाचं विसर्जन करावं की नाही? याबाबत शास्त्र काय सांगते? जाणून घेऊया...
प्राचीन मान्यतेनुसार, मंगळवार हा गणपती बाप्पाला समर्पित असल्याने या दिवशी गणरायाची विशेष पूजा केली जाते. मंगळवारी गणपतीचं नामस्मरण, उपासना, सेवा केल्याने पुण्य फलाची प्राप्ती होते, असं सांगितलं जातं.
दर मंगळवारी न चुकता उपवास करुन बाप्पाची सेवा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आता मंगळवारी लाडक्या बाप्पाचं विसर्जन कसं करावं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मंगळवारी अनंत चतुर्दशीला गणपतीचं विसर्जन न करता दुसऱ्या दिवशी करावं का, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.
परंतु, तसं पाहिलं तर मंगळवार आणि गणपती विसर्जन याचा तसा काही संबंध नाही. यापूर्वीही 2015 आणि 2020 मध्ये अनंत चतुर्दशी मंगळवारी आली होती.
त्यामुळे यंदाही आपण प्रथा, परंपरेनुसार 17 सप्टेंबरला गणपती विसर्जन करू शकता, असं सांगितलं जातं.
त्यामुळे मंगळवारी वाजतगाजत मिरवणुका काढत बाप्पाला साश्रु नयनाने निरोप दिला जाणार आहे.