Ganesh Chaturthi 2025 : मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेश मंडळ, 474 कोटींची विमा पॉलिसी अन् कर्माचाऱ्यांनाही विमा संरक्षण, जीएसबी सेवा मंडळाने बनवला रेकॉर्ड
Ganesh Chaturthi 2025 : जीएसबीच्या गणपती मंडळाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जीएसबी गणेश मंडळाने 474 कोटींचा विमा उतरवला आहे.
Ganesh Chaturthi 2025
1/8
गणेशोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच मुंबईतील जीएसबीचा गणपती हा नेहमी आकर्षणाचा आणि उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरतो.
2/8
याच जीएसबीच्या गणपती मंडळाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जीएसबी गणेश मंडळाने 474 कोटींचा विमा उतरवला आहे.
3/8
गेल्या वर्षी या मंडळाने 400 कोटींचा विमा उतरवला होता. मात्र, यावेळी या विम्यामध्ये 74 कोटींची वाढ झाली आहे.
4/8
न्यू इंडिया इश्युरन्स कंपनीने जीएसबी गणेश मंडळासाठी हा विमा काढण्यात आला आहे. 474 कोटी रुपयांच्या विम्यासाठी किती रुपये प्रिमियम आहे हे अद्याप सांगण्यात आलं नाही.
5/8
मुंबईत जीएसबी मंडळाकडे 67 कोटींचे सोन्याचे दागिने असल्याची माहिती आहे. या सोन्यासह मंडळाकडे 325 किलोहून अधिक चांदी आहे. सोनं, चांदी आणि दागिन्यांचं मूल्य वाढल्याने यंदाच्या वर्षीचा विमाही आता वाढला आहे.
6/8
महत्त्वाची बाब म्हणजे जीएसबी मंडळातील स्वयंसेवक, पुजारी, आचारी, सुरक्षा कर्मचारी या लोकांनाही विम्याचं संरक्षण देण्यात आलं आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसोबतच नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीचाही या विम्याच्या रकमेत समावेश आहे.
7/8
दरम्यान, मुंबईतील किंग्स सर्कल येथील जीएसबी गणपती मंडळ मुंबईतील सर्वात श्रीमंत मंडळांपैकी एक आहे. गणेशोत्सवाच्या या पाच दिवसांत मंडळाकडून अन्नदान सुरू असते.
8/8
यंदा दान करणाऱ्या भक्तांसाठी वेगळी प्रवेश व्यवस्था तसेच, भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अशी मंडळाची माहिती आहे.
Published at : 21 Aug 2025 10:05 AM (IST)