Ganesh Chaturthi 2024 : घराच्या 'या' दिशेला करा गणपतीची स्थापना; बाप्पा होईल प्रसन्न
Ganesh Chaturthi 2024 : या गणेश चतुर्थीला तुम्हीही तुमच्या घरात बाप्पाची प्रतिष्ठापना करणार असाल तर बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी योग्य दिशा जाणून घेणे खूप गरजेचे आहे.
Ganesh Chaturthi 2024
1/11
कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाची पूजा करून केली तर सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडतात आणि त्या कार्यात यश मिळते.
2/11
कोणत्याही शुभ कार्यात श्रीगणेशाची पूजा केली जाते, त्यानंतरच शुभ कार्य सुरू होते.
3/11
दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जातो.
4/11
या गणेश चतुर्थीला तुम्हीही तुमच्या घरात बाप्पाची प्रतिष्ठापना करणार असाल तर बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी योग्य दिशा जाणून घेणे खूप गरजेचं आहे.
5/11
गणपती बाप्पाचे मुख दक्षिण दिशेला नसावे, यामुळे तुम्हाला फायद्याऐवजी नुकसानाला सामोरे जावे लागू शकते.
6/11
ऑफिसमध्ये गणपती बसवायचा असेल तर त्याची उभी मूर्ती किंवा चित्र निवडा, यामुळे वास्तुदोष दूर होतात.
7/11
वास्तुशास्त्रात गणेशाच्या मूर्तीचा रंगही सांगितला आहे. घरामध्ये गणपतीची मूर्ती बसवायची असेल तर पांढऱ्या रंगाची निवड करा. यामुळे वास्तूदोष दूर होण्यास मदत होते. त्याच वेळी, लाल रंगाची मूर्ती देखील घरासाठी योग्य असल्याचे सांगितले जाते.
8/11
मुलांच्या शिक्षणात यश मिळवायचे असेल तर अभ्यासाच्या टेबलावर पिवळ्या किंवा फिकट हिरव्या रंगाची बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती बसवा.
9/11
वास्तुशास्त्रात कोणतीही गोष्ट योग्य दिशेने ठेवण्याचे काही नियम आहेत. घराच्या ईशान्य कोपऱ्यातच गणपतीची मूर्ती स्थापित करा.
10/11
तसेच चुकूनही त्यांची मूर्ती किंवा फोटो दक्षिण दिशेला ठेवू नका, यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते.
11/11
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 06 Sep 2024 12:09 PM (IST)