Ganesh Chaturthi 2024 : गणेश पूजन कधी करावं? जाणून घ्या अचूक मुहूर्त
गणरायाची स्थापना करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे गणेश पूजनाचा मुहूर्त नेमका कोणता याबद्दल अनेकांच्या मनात द्विधा मनस्थिती असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदा.कृ.सोमण, ज्येष्ठ पंचांगकर्ते सांगतात, 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजून 22 मिनिटांपासून ते दुपारी 01.50 पर्यंत मध्यान्ह काल आहे. या वेळेत गणेश पूजन करावं. पण सर्वांना हे शक्य होईल असं नाही
प्रात:काळ पासून म्हणजेच पहाटे 4 वाजल्यापासून मध्यान्हकाल संपेपर्यंत म्हणजेच दुपारी 01 वाजून 50 मिनिटांपर्यंत गणेश पूजन करावं.
अगदी कोकणी माणसापासून ते मुंबईकरांपर्यंत प्रत्येकालाच सध्या बाप्पाच्या आगमनाची आस लागली आहे. गल्लोगल्ली ढोल-ताशा पथकांची तयारी, आगमन सोहळे, मंडप सजावटी पाहून मनातील आतुरता आणखी वाढत जाते.
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सर्व प्रथम सकाळी लवकर उठणं, अंघोळ करणं, देव्हारा स्वच्छ करुन बाप्पाची पूजा करणं.
दररोज सकाळ-संध्याकाळ श्रीगणेशाची आरती करुन बाप्पाला विविध प्रकारचा नैवेद्य दाखवावा आणि शेवटच्या दिवशी श्रद्धेने त्याचा निरोप घ्यावा आणि मूर्तीचं विसर्जन करावं.
गणेशोत्सवात गणेशाची विधिवत पूजा केल्याने बाप्पा मनुष्याला प्रत्येक संकटातून मुक्त करतो सुख-समृद्धीसोबतच बाप्पा भक्तांना संपत्तीचा आशीर्वाद देतात. .
श्रीगणेशाच्या पूजेमुळे घरात सुख, शांति आणि समृद्धी नांदते, घराची भरभराट होते, असं मानलं जातं. कोणत्याही शुभकार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणेशाची आराधना करतात.