Dussehra tradition : दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं वाटण्यामागचे पौराणिक व वैज्ञानिक कारण .

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवसाला भारतीय संस्कृतीत खूप महत्व आहे. या दिवशी रामाने रावणाचा वध केल्याचे सांगितले जाते,या दिवशी रावण दहनही केले जाते. शस्त्रांची पूजा पण केली जाते.

Dussehra tradition (Photo credit : pinterest )

1/10
शारदीय नवरात्री संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी दसरा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो, यालाच 'विजयादशमी' असेही म्हणतात.
2/10
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवसाला भारतीय संस्कृतीत खूप महत्व आहे. या दिवशी रामाने रावणाचा वध केल्याचे सांगितले जाते, त्यामुळे या दिवशी रावण दहनही केले जाते. तसेच शस्त्रांची पूजा देखील केली जाते.
3/10
या दिवशी धन, ज्ञान आणि भक्ती यांची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोनं किंवा आपट्याची पानं, पाटी-पुस्तक म्हणजे सरस्वती देवी, आणि शस्त्रांची पूजा केली जाते.
4/10
पण या सर्वात कधी हा प्रश्न पडला का की दसऱ्यामध्ये सोनं म्हणून आपट्याचीच पानं का देतात? चला जाणून घेऊयात.
5/10
आपट्याच्या पानांची एक पौराणिक कथा आहे म्हणून दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं वाटतात.
6/10
रघुकुलमधील श्रीरामचंद्राच्या पूर्वजांनी खूप संपत्ती कमावली होती पण त्यांनी ती स्वत:कडे न ठेवता दान केली आणि त्यांनी मात्र वानप्रस्थाश्रम स्वीकारले.
7/10
अरण्यात असलेल्या राजाकडे त्यांचा कुलगुरू कौत्समुनी 14 कोटी सुवर्णमुद्रा दान म्हणून मागितली. पण, तेव्हा राजाकडे धन नव्हते कारण ते वानप्रस्थाश्रमाला निघाले होते.
8/10
पण तरीही गुरूंची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी इंद्रदेवांना आवाहन दिले आणि त्या युद्धात इंद्रदेवांचा पराभव झाला.
9/10
राजांनी इंद्रदेवांकडे राज्य नको फक्त 14 कोटी सुवर्णमुद्रा हवी असल्याचे सांगितले.
10/10
इंद्रदेवांनी आपट्याच्या पानांवर सोन्याचा वर्षाव केला; म्हणून विजयादशमीला पानांना सोन्याचे प्रतीक मानून वाटले जाते आणि म्हणतात, सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा.
Sponsored Links by Taboola