PHOTO : स्वप्नात 'या' गोष्टी खाताना स्वतःला पाहाल, तर गडगंज श्रीमंत व्हाल
त्याचप्रमाणे काही खाद्यपदार्थ आहेत, जे आपल्याला आवडतात आणि जे खाण्याचा आपण विचार करतो. अनेक वेळा या गोष्टी खाण्याची स्वप्नंही आपण पाहतो. पण, या स्वप्नांचा संबंध तुमच्या आयुष्याशी असतो, जाणून घ्या कसा...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वप्नात आवळा खाणं : स्वप्नात स्वतःला आवळा खाताना पाहण्याचा अर्थ असा आहे की, आर्थिक सुबत्तेशी संबंधित तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. पण, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात फक्त आवळा दिसला आणि तो तुम्ही खात नसाल, तर मात्र, याचा अर्थ तुमच्या काही इच्छा अपूर्ण राहू शकतात.
आलं खाण्याचा अर्थ : स्वप्नात आलं खाताना पाहणं सकारात्मकतेचं प्रतिक मानलं जातं. आलं हे सुख, समृद्धी आणि वाढीचं लक्षण मानलं जातं. स्वप्नात स्वतःला आलं खाताना पाहून तुमची प्रतिष्ठा आणि संपत्ती वाढते.
स्वप्नात अननस खाणं : जर तुम्ही स्वप्नात अननस खाताना पाहिलं असेल तर याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला सुरुवातीला कोणत्याही कामात अडचण येईल आणि नंतर तेच काम सहज पूर्ण होईल. तुम्हाला लवकरच अमाप संपत्ती मिळेल आणि पैशामुळे तुमचं कोणतंही काम थांबणार नाही.
जर तुम्ही स्वतःला स्वप्नात आईस्क्रिम खाताना पाहिलं तर... आईस्क्रीम कोणाला आवडत नाही? जरी ते आईस्क्रीमशी संबंधित स्वप्न असलं तरी ते तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल. स्वप्नात आईस्क्रीम खाण्याचा अर्थ असा आहे की, तुमचं जीवन आनंदानं आणि शांततेनं भरून जाईल. तसेच, तुमची सर्व कामं कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात फक्त आईस्क्रीम दिसलं आणि ते तुम्ही खाल्लं नाही तर याचा अर्थ असा आहे की, शेवटच्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर तुमची कामं रखडतील.
स्वप्नात अक्रोड खाल्ले तर... स्वप्न असो वा वास्तव, अक्रोड खूप शुभ मानलं जातं. स्वप्नात अक्रोड पाहणं म्हणजे, तुमच्या आयुष्यात सुखाची चाहुल, असंच समजा. याचा अर्थ असाही होऊ शकतो की, लवकरच तुमच्या घरात चिमुकल्याचं आगमन होणार आहे. याशिवाय स्वप्नात दिसणारं अक्रोड अचानक धनप्राप्तीबद्दलही संकेत देतं
स्वप्नात ओवा दिसणं... जर तुम्हाला स्वप्न पडलं आणि तुम्हाला एखाद्या खाद्यपदार्थात तुम्ही ओवा टाकत असल्याचं दिसलं, तर तुम्ही दीर्घायुषी व्हाल. यासोबतच मोठा धनलाभ होण्याचे संकेतही तुम्हाला मिळतात. तसेच, तुम्ही आजारांपासून दूर राहता.
स्वप्नात आंबा दिसणं... आंबा हा भगवान श्री रामाचा प्रसाद मानला जातो आणि आंबा हनुमानजींनाही प्रिय आहे. त्यामुळे स्वप्नात आंबा पाहणं देखील शुभ मानलं जातं. स्वप्नात स्वतःला आंबा खाताना पाहणं म्हणजे संपत्ती आणि मुलांकडून आनंद. झाडावरून आंब्याचं फळ तुमच्या हातात पडलं तर ते अफाट संपत्ती मिळण्याचे संकेत मानले जातात.
चिंच खाणं : आंबट चवीमुळे चिंच बहुतेक महिलांना जास्त आवडतात, पण पुरुष मात्र त्यापासून दूर पळतात. स्वप्नातही असं काहीतरी असतं. स्त्रीच्या स्वप्नात चिंच दिसली तर ते शुभ मानलं जातं. तसेच, पुरुषांनी त्यांच्या स्वप्नात चिंच पाहणं चांगलं मानलं जात नाही. पण जर महिलांना स्वप्नात चिंच दिसली तर याचा अर्थ सोनं, चांदी आणि संपत्ती प्राप्तीसोबत जोडला जातो.