वसुबारस पूजनाने दिवाळीची मंगलमय सुरुवात; भक्ती, परंपरा आणि समृद्धीचा संगम!
आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आजचा दिवस हा वसुबारसचा आहे. या दिवशी गाय आणि वासराचे पूजन करून त्यांना ओवाळलं जातं.
Continues below advertisement
vasubaras 2025
Continues below advertisement
1/9
वसुबारस हा सण गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि तिच्या महत्त्वाची जाणीव करून देणारा सण आहे.
2/9
या दिवशी गाईला गोड पदार्थ, बाजरीची भाकरी आणि पाणी अर्पण केलं जातं. तसेच, गाईची विधीवत पूजा करतात.
3/9
गाईला अन्न देणे म्हणजे समृद्धी, आरोग्य आणि शांततेचे प्रतीक मानलं जातं. गायींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.
4/9
गाईला गौमाता मानून तिला कुटुंबातील सदस्याप्रमाणे सन्मान दिला जातो. या सणामुळे मुलांमध्ये पशुप्रेम आणि निसर्गाविषयी आदराची भावना निर्माण होते.
5/9
ग्रामीण भागात या दिवशी महिला पारंपरिक गाणी म्हणत गाईची आरती करतात. या दिवसानिमित्त महिलां पारंपरिक साडी परिधान करून पूजा करतात. हट्टी तालुक्यातील सिलोड येथील महिलांनी आजही ही जुनी परंपरा जपून ठेवत आहेत.
Continues below advertisement
6/9
वसुबारस हा सण निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याची जाणीव करून देतो. शेती आणि दूध या दोन्हींचा आधार असलेल्या गाईचे आज विशेष पूजन केले जाते.
7/9
महिलांकडून बाजरीच्या पिठाचे दिवे तयार करून त्याने गाय-वासरांना औक्षण केले जाते. वसुबारसच्या पूजेत बाजरीचे विशेष महत्त्व आहे.
8/9
या दिवसानिमित्त महिला पारंपरिक साडी परिधान करून पूजा करतात. या उत्सवामुळे गावात एकोपा, आनंद आणि भक्तीचे वातावरण निर्माण होते.
9/9
वसुबारस हा सण मातृत्व, श्रद्धा आणि निसर्गाप्रती आदर व्यक्त करणारा आहे. या दिवशी घराघरात उत्साह, भक्ती आणि आनंदाचे वातावरण असते.
Published at : 17 Oct 2025 11:51 AM (IST)