Diwali 2025: दिवाळीत कोणत्या दिवशी कराल पूजा? वसुबारस ते लक्ष्मीपूजन जाणून घ्या सर्व शुभ मुहूर्त आणि सुख-समृद्धीसाठी योग्य वेळ!

दिवाळीचा उत्साह सर्वत्र आहे, पण हा सण कोणत्या शुभ मुहूर्तावर साजरा करावा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वसुबारसपासून लक्ष्मीपूजनापर्यंतचे सर्व शुभ मुहूर्त वाचा आणि योग्य वेळ जाणून घ्या...

Continues below advertisement

Diwali 2025

Continues below advertisement
1/10
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सणात येणाऱ्या विविध तिथी आणि मुहूर्ताबद्दल अनेकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. खरं म्हणजे, दिवाळी ही वसुबारस ते भाऊबीज पर्यंत साजरी केली जाते.
2/10
या काळात देवी लक्ष्मी आणि कुबेर देवाची विशेष पूजा केली जाते. म्हणूनच त्याला रात्रीचा उत्सव असेही म्हणतात. दिवाळीच्या सणाची खरं तर प्रत्येकाला उत्सुकता आहे.
3/10
हा उत्सव कोणत्या शुभ मुहूर्तावर साजरा केला पाहिजे? घरात सुख-समृद्धीसाठी कधी पूजा केली पाहिजे? वसुबारस ते लक्ष्मीपूजन पर्यंतचे मुहूर्त काय? या संदर्भात पंचांगकर्ते अधिक माहिती जाणून घेऊया.
4/10
वसुबारस – 17 ऑक्टोबर 2025, शुक्रवार. पूजा मुहूर्त सकाळी 5:14 ते सायंकाळी 7:43 आहे.
5/10
गुरु द्वादशी, धनत्रयोदशी आणि यमदीपदान – 18 ऑक्टोबर 2025, शनिवार साजरे होणार आहेत.
Continues below advertisement
6/10
नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नान आणि यम तर्पण – 20 ऑक्टोबर 2025, सोमवार या दिवशी केले जातील.
7/10
लक्ष्मीपूजन मुहूर्त – 21 ऑक्टोबर 2025, मंगळवार; दुपारी 3 ते 4:30 आणि सायंकाळी 6 ते 8:40.
8/10
वहीपूजन मुहूर्त – 22 ऑक्टोबर 2025, बुधवार; पहाटे 3:20 ते 6:00, सकाळी 11 ते 12:30, आणि सायंकाळी 6:30 ते 8:00.
9/10
यमद्वितीया (भाऊबीज) – 23 ऑक्टोबर 2025, गुरुवार साजरी होणार आहे.
10/10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola